Home चंद्रपूर संतापजनक :- नायब तहसीलदार भांदककर हेच खरे अवैध गौण खनिज उत्खननाचे सूत्रधार?

संतापजनक :- नायब तहसीलदार भांदककर हेच खरे अवैध गौण खनिज उत्खननाचे सूत्रधार?

हजारो ब्रॉस गौण खनिज उत्खनन प्रकरणी नायब तहसीलदार भादककर यांच्यावर पण कारवाई करण्याची मागणी.

चंद्रपूर :-

भद्रावती तहसील कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून नायब तहसीलदार पदावर कार्यरत असणारे भांदककर यांच्या आशीर्वादाने तिरवंजा येथील गौण खनिज उत्खनन होत॑ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असुन काँग्रेस चे नेते तथा ट्रांसपोर्टर शामकांत थेरे यांचा गौण खनिज वाहतूक करणारा ट्रक उपविभागीय अधिकारी यांनी पकडल्या नंतर सर्व बाबी उघड होत॑ आहे, दरम्यान तिरवंजा येथील गौण खनिज उत्खनन पाहणी केली असता त्या ठिकाणी जवळपास एक किलोमीटर परिसरात गौण खनिज उत्खनन झाल्याने मोठं मोठे खड्डे पडले आहे, या सर्व खड्डय़ांचे मोजमाप केले तर लाखों ब्रॉस गौण खनिज उत्खनन झाल्याची बाब उघड होत॑ आहे व ते उत्खनन ज्यांनी केले त्यांच्यावर 100 कोटींपेक्षा जास्तीचा दंड आकारला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तिरवंजा येथील गौण खनिज उत्खनन एवढ्या मोठ्या प्रमाणात होत॑ असतांना भद्रावती येथील तहसीलदार व नायब तहसीलदार काय करत होते ? हा गंभीर प्रश्न असुन सूत्रांच्या माहितीनुसार नायब तहसीलदार भांदककर हेच खरे यामागील खरे सूत्रधार असल्याचे स्पष्ट होत॑ आहे. कारणं अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांनी नायब तहसीलदार भांदककर यांच्याशी सलगी ठेवली असल्याची माहिती असुन आता त्यांच्या माध्यमातून अवैध गौण खनिज उत्खननाचे मोजमाप करणे म्हणजे त्या सर्वांना वाचविण्याचा प्रयत्न करणे आहे. दरम्यान ते काही दिवसांतच सेवानिवृत्त होणार असल्याने ते या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी शक्तीची रजा ते घेऊ शकतात असे पण बोलल्या जातं आहे.

तिरवंजा येथील शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविला असल्याचे समोर आल्यानंतर त्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी यासह त्यांच्या मशीन व ट्रक जप्तीची कारवाई होईल पण त्यांच्या या अवैध कामाला पैसे घेऊन अनुमती देणाऱ्या तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न निर्माण होत॑ आहे, सरकारी नौकरी करतांना सरकारी संपत्ती संरक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य असतांना उलट सरकारी संपत्ती ची चोरी करणाऱ्यांना संरक्षण देणे म्हणजे हा देशाद्रोह सारखा गंभीर गुन्हा आहे आणि हा गुन्हा अनेक वर्षांपासून भद्रावती येथे कार्यरत भांदककर यांनी केल्याचे समोर येतं असल्याने त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्या चल अचल संपत्ती ची चौकशी होऊन ती संपत्ती जप्त करण्याची कारवाई पण झाली पाहिजे अशी मागणी होत॑ आहे.

Previous articleजुनी पेन्शन साठी १४ डिसेंबर पासून राज्यातील १७ लाख कर्मचारी जाणार बेमुदत संपावर
Next articleअत्यंत दुर्दैवी:- चंद्रपूर कृउबा समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांचासह दोन जण वर्धा नदीत बुडाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here