मोठ्या वडिलांच्या अस्थि विसर्जनासाठी वर्धा नदीच्या पात्रामध्ये गेले असता घडली घटना, या घटनेने समाजमन हळहळले.
चंद्रपूर :-
संकट कधी येईल याचा नेम नसतो याची प्रचिती नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगावं येथे घडली असून मोठ्या वडिलांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी वर्धा नदी पात्रात अस्थी विसर्जन करण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे हे नांदगाव येथील वर्धा नदीच्या पात्रामध्ये अस्थी घेऊन गेले असता त्यांचा मुलगा व भाचा नदीमध्ये उतरले होते मात्र ते पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडाले असता त्यांना वाचविण्यासाठी गोविंदा पोडे हे सुध्दा पाण्यात उतरले आणि नदीच्या प्रवाहामध्ये ते सुद्धा वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना काल घडली असून त्यांचा त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे समाजमन हळहळले आहे
कृषीउत्पन्न बाजार समिती चंद्रपूर चे उपसभापती तथा बल्लारपूर पंच्यायत समितीतीचे माजी सभापती व महंतगिरी ऍग्रो फॉर्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक, संयमी राजकारणी शांत व मनमिळाऊ स्वभाव असणारे गोविंदाभाऊ पोडे त्यांचा मुलगाँ चेतन पोडे व गणेश उपरे भाचा यांचे काल वर्धा इरई नदी संगम पात्रात दुःखद निधन झाले. मनाला चटका लाऊन देणाऱ्या या घटनेतून त्यांच्या परिवाराला डोंगर येवढ्या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना.विनम्र