Home Breaking News आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते दाताळा येथील विकासकामाचे भुमिपूजन

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते दाताळा येथील विकासकामाचे भुमिपूजन

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते दाताळा येथील विकासकामाचे भुमिपूजन

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- स्थानिक विकास आमदार निधीतुन मंजुर दाताळा ग्राम पंचायतच्या म्हाडा क्रिडांगणाच्या आरक्षित जागेवर सौरक्षणभिंतीच्या बांधकामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. या विकास कामासाठी 22 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून भूमिपूजनानंतर सदर कामाला सुरवात होणार आहे.
आज पार पडलेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला दाताळा सरपंच सुनिता देशकर, उपसरपंचा विजयालक्ष्मी नायर, सचिव गणेश कोकोडे, ग्रामपंचायत सदस्य बंडू मत्ते, मधुकर हिवरकर, सुशांत शर्मा, छाया डांगे, प्रतिभा काळे, अनीमा घागरगुंडे ,ज्योती किरकिरे, अनिल नरुले, मयुर मदनकर, अतुल गावड, नितेश शेंडे, देवेंद्र देशकर, अरुण जुंनघरे, दीपक निवल, साहेबराव कांबळे, लता मदनकर, किरण रोहने, उपरे, अक्षय काकडे, सूरज रसपायले, सहील चीवंडे, प्रशांत चीवंडे , उपरे, विजय गवड, पंकज खोपे, शुभम देहारकर, यश काकडे, अक्षय देशकर, अक्षय जोगी, योगेश पेलने, आर्यन चिकटे, संकेत गुरणुले, गौरव चैधरी, गाजानन पांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागाअंतर्गत मोठा निधी उपलब्ध करुन दिला असून या निधीतून मतदार संघातील शहरी भागासह ग्रामीण भागाचा विकास केल्या जात आहे. ग्रामीण भागात समाज भवन, सौंदर्यीकरण यासह मुलभूत सोयी सुविध उपलब्ध करण्यावर भर देत मोठा निधी खर्च केल्या जात आहे. शहरी भागाच्या विकासासाठीही मोठा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध केला असून या निधीतून मतदारसंघात अभ्यासिका, समाज भवन, व ईतर मुलभुत सोयी सुविधेची कामे केल्या जात आहे.
दरम्यान दातळा येथील दाताळा ग्राम पंचायतच्या म्हाडा क्रिडांगणाच्या आरक्षित जागेवर सौरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी स्थानिक विकास आमदार निधीतून सदर कामासाठी 22 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून येथील सौरक्षणभिंतिचे काम पुर्ण केल्या जाणार आहे. आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी या विकासकामाचे भुमिपूजन केले. ग्रामस्थांची मागणी पूर्ण करता आली आली. दाताळा गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देता आला. राज्य सरकारही ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. पूढेही या गावाच्या विकासासाठी आपण निधी देणार असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. सदर भूमिपूजन कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होत

Previous articleवाघाच्या हल्यात ठार झालेल्या मनोहर वाणी यांच्या कुटुंबियांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट
Next articleखळबळजनक :- एका राजकीय माजी पदाधिकाऱ्यांनी खंडणीसाठी कुटुंबालाचं संपविण्याची दिली धमकी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here