Home क्राईम स्टोरी खळबळजनक :- एका राजकीय माजी पदाधिकाऱ्यांनी खंडणीसाठी कुटुंबालाचं संपविण्याची दिली धमकी ?

खळबळजनक :- एका राजकीय माजी पदाधिकाऱ्यांनी खंडणीसाठी कुटुंबालाचं संपविण्याची दिली धमकी ?

त्या सीटीपीएस कर्मचाऱ्याना का मागण्यात येतं आहे खंडणी? याचा होणार खुलासा ?

चंद्रपूर :-

पैसे कमाविण्याच्या नादात काही लोक आपलं करिअर बरबाद करत असतात, असे कित्तेक मामले समोर येतं असतांना आता एका राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यानी काही गुंड सोबत घेऊन सिटीपीएस च्या दोन कर्मचाऱ्याना तुम्ही एवढे पैसे द्या अन्यथा तुम्हचा व्हीडिओ सार्वजनिक करतो व तुम्हच्यावर गुन्हे दाखल करायला लावतो अशी खंडणीसाठी धमकी दिल्याची व ते दोन कर्मचारी धास्तीने पळून गेल्याने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला सुद्धा संपविण्याची धमकी दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबत मोठी गोपनीयता पाळली जातं असली तरी ते प्रकरण नेमकं काय आहे याबाबत लवकरच खुलासा होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे.

सिटीपीएस मधील एक मोठा घोटाळा नेहमीच चर्चेत राहत असतो, त्यातच आता दोन कर्मचाऱ्यांनी केलेला घोटाळा व तो घोटाळा बाहेर येऊ म्हणून काही व्यक्तीला ठार मारण्याची किंव्हा गंभीर जखमी करण्याची एका राजकीय माजी पदाधिकारी यांनी घेतलेली सुपारी आणि ती सुपारी देतांना घेतलेला व्हीडिओ यावरून सुपारी घेणाराचं व्यक्ती आता त्या सिटीपीएस कर्मचाऱ्यांना खंडणी मागत असल्याचा प्रकार समोर आला आहे, दरम्यान त्यातील एकाने काही लाख रुपये व्याजाने त्या खंडणी मागणाऱ्या राजकीय माजी पदाधिकारी याला दिले असल्याची पण बाब समोर येतं आहे. तर दुसऱ्या कर्मचाऱ्याला एका ठिकाणी घेऊन जाऊन व त्याला मारहाण करून मी तुम्हच्याकडून पैसे घेतले व ते मी परत करतो अशा प्रकारचा व्हीडिओ तयार केला असल्याची माहिती आहे. दरम्यान सदर प्रकरणातील ते दोन कर्मचारी मारहाण होण्याच्या भीतीने बाहेर पळून गेले असल्याने त्यांच्या घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ दिली जातं आहे व तुम्हचा मुलगा माझ्यासमोर हजर करा अन्यथा तुम्हांला सगळ्यांना आम्ही संपवून टाकीन अशी धमकी पण दिली जातं असल्याने ते राजकीय व गुंड व्यक्ती कोण आहेत याचा शोध पोलीस प्रशासन घेईल का ? व त्या दोन कर्मचाऱ्यांकडून तशा तक्रारी होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here