Home चंद्रपूर आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते महेंद्र ढूमने...

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते महेंद्र ढूमने यांच्या असंख्सं कार्यकर्त्यासोबत आम आदमी पक्षात प्रवेश

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर  :-  जिल्ह्यातील युवा नेते महेंद्र ढूमने यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली व शंकर सरदार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना महेंद्र दूमने म्हणाले की, आम आदमी पक्ष हा एकच पक्ष आहे. जो खऱ्या अर्थाने जनतेच्या हितासाठी काम करतो दिल्ली, पंजाब आणि गोवा या राज्यांमध्ये आम आदमी पक्षाने केलेल्या कामांमुळे माझ्या मनात या पक्षाच्या खूप आदर व विश्वास निर्माण झालेला आहे.

यामुळेच महेंद्र ढूमने व त्यांचे असंख्य कार्यकर्ते सोबत आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.चंद्रपुरमधी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, महेंद्र ढूमने यांचे आम आदमी पक्षात स्वागत आहे. ते एक अनुभवी आणि कार्यक्षम आहेत. त्यांचा पक्षात प्रवेश आम आदमी पक्षाला अधिक मजबूत करेल. त्यांच्या सोबत तेजस तिगुटला, वैभव पेचे, निलेश गायकवाड, गौरव पोहाकार, नेहल चिवडे, साहिल हजारे, सुरज मोरे, पवन म्हस्के, भवानी सिवी, संदीप वर्मा, जोशी, मयूर इंगळे, गोलू कनोजिया, भवानी बैस, शुभम इंगळे, मनीष इंगळे, सोनू चिवडे, साईराम बल्की, आशु केमेकर, सुजित वर्मा, सुरज कानोजिया, बबलू मानकर, सन्नी गिल, प्रवीण काळे, कृष्णा तीगुटला, सागर काळे, नंदू झाडे, चेतन पत्रकार, उदय तांड्रा, चिंटू पोगला, मंगेश मुंजेवार, नागेश गायकवाड, कैलाश गायकवाड, दिपक बहुरिया, आकाश भगत, अमित पोटे, अंकुश तडेल, अक्षय सोयाम यांनी प्रवेश केला.

या वेळेस आम आदमी पक्षाचे पदाधिकारी सुरज शाह, सुमित हस्तक, नितीन बावणे, गणेश आडे इत्यादी उपस्थित होते.महेंद्र ढूमणे यांचे थोडक्यात परिचय महेंद्र दूमणे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अनेक युवकांचे संगठन उभे केले आहेत. ते अनेक युवकांच्या हक्कांसाठी लढा देत असतात वेळोवेळी रात्री बे रात्री गरिबांसाठी धावून येत असतात आणि महेंद्र ढुमणे हे आताच नाहीतर गेल्या कित्येक वर्षांपासून गोरगरिबांसाठी धावून येणारे युवा नेते आहे. म्हणून यांची चंद्रपूर जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण आहे म्हणून यांचा फायदा चंद्रपूर मधील आम आदमी पक्षाला संघटन व पक्ष मजबुतीसाठी खूप मोठा फायदा होणार आहे असे दिसून येत आहे.

Previous articleखळबळजनक :- एका राजकीय माजी पदाधिकाऱ्यांनी खंडणीसाठी कुटुंबालाचं संपविण्याची दिली धमकी ?
Next articleब्रेकिंग :- वरोरा नाक्याजवळ तीन चारचाकी अपघातात फुटल्या, मोठी दुर्घटना टळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here