Home चंद्रपूर माणूसकी फाँडेशन च्या सहकार्याने या वर्षी सुद्धा प्रकाश नगर मधील गोर-गरीब कुटूंबा...

माणूसकी फाँडेशन च्या सहकार्याने या वर्षी सुद्धा प्रकाश नगर मधील गोर-गरीब कुटूंबा सोबत दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

शिक्षनाप्रति जनजागृती व्हावी म्हणून पेन्सिल, खोडरबर,नोट बुक, ABCD, 1 2 3 चे चार्ट वाटप करण्यात आले.

चंद्रपूर  :-  माणुसकी ग्रूप चंद्रपूर तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शनिवार दिनांक 25/11/2023 ला प्रकाश नगर बायपास रोड चंद्रपूर येथील गोर-गरीब कुटूंबा सोबत दिवाळी सण साजरा करण्यात आला.दिवाळी निमित्त त्यांना 100 फराळाचे डबे (लाडू, चकली,चिवडा,शंकरपाळे,) वाटप करण्यात आले.
सोबतच शिक्षनाप्रति जनजागृती व्हावी म्हणून पेन्सिल, खोडरबर,नोट बुक, ABCD, 1 2 3 चे चार्ट वाटप करण्यात आले.

 

गोर गरीबांना दिवाळी सारख्या सणाचा आनंद लुटता यावा आणि सोबतच पर्यावरण आणि शिक्षणाप्रती आवड, जनजागरूती व्हावी या उद्देशाने माणुसकी ग्रूप च्या सदस्यांकडून हा उपक्रम राबविण्यात आला. हातावर आणून पोट भरणारे व्यक्ती आर्थिक परिस्तिथी दोन वेळचे अन्न बरोबर मिळवू शकत नाही तर शिक्षणासाठी उपयोगी वस्तू खरेदी कुठून करणार. या मुळे त्यांची मुलं शिक्षणा सारख्या मूलभूत गोष्टीपासून वंचित राहतात. मग हीच मुले बालकामगार म्हणून समाजात वावरतात आणि मोठी होऊन आपल्या आई वडिलान प्रमाणे परत मोलमजुरी नोकरशाही चे जीवन जगतात.

 

हे चक्र सुरूच असते या मुळे हा वंचित समाज सामाजिक शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या वर येऊ शकतं नाही. हीच कमी भरून काढण्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न होता.कार्यक्रमाला अतिशय उत्कृष्टरित्या पार पडला. मुलांनी फराळाचा आस्वाद घेतला.आकाशकंदील नाच-गाणी, abcd ,1 2 3, चे वाचन यांचा आनंद लुटला.

                     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
शिक्षक रोहनकर दाम्पत्यांनी मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे योग्य मार्गदर्शन केले. सोबतच माणुसकी ग्रूप च्या सदस्यांना पुढील कामगिरीसाठी शुभेच्या दिल्या. विशेष म्हणजे फटाके न फोडता देखील दिवाळी साजरी केल्या जाऊ शकते हा संदेश या वेळी मुलांना आणि समाजातील नागरिकांना देण्यात आला.या कार्यात समाजसेविका नेत्रा इंगुलवार मॅडम, आपल्या लाडक्या चंदाताई वैरागडे, आणि पुणेकर भाऊ यांचे विशेष सहकार्य लाभले.

मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात दया🙏🏻
माणुसकी ग्रूप चंद्रपूर

टिप – आपल्यापैकी कोणालाही आपला वाढदिवस लग्न वाढदिवस किंवा कोणत्याही प्रकारचे सेलिब्रेशन सामाजिक रीतीने गोरगरिबासोबत किंवा मतिमंद सोबत सेलिब्रेशन करण्यास इच्छुक असल्यास  एक हाथ मदतीचा म्हणून माणुसकी ग्रूप शी संपर्क साधावा🙏🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here