अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
संविधान उद्देशिकेचे वाचन
चंद्रपूर :- २६ नोव्हेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला, याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर व डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे, २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु, संविधान सभेने ही राज्यघटना स्विकारल्यानंतर देशात त्याची अमंलबजावणी होण्यास काही महिने लागले. २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना
पूर्णपणे लागू करण्यात आली. राज्यघटना हि १९५० रोजी लागू झाली असली तरी आजही संविधान लागू करण्याचे उद्देश काय याची अनेकांना माहिती नाही त्यामुळे जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार संविधान दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील,उपायुक्त श्री. अशोक गराटे,उपायुक्त श्री. मंगेश खवले, उपअभियंता श्री.विजय बोरीकर,सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बोबाटे,श्री. सचिन माकोडे,विधी अधिकारी श्री. अनिलकुमार घुले,श्री. अनिल बाकरवाले, डॉ.अमोल शेळके,श्री. संतोष गर्गेलवार,सौ.प्रगती भुरे,सौ.सारिका शिरभाते,सौ.वैष्णवी रिठे,श्री. सारंग निर्मळे,श्री. विजय भुरकुंडे,श्री. विकास दानव, श्री. प्रदीप पाटील,श्री. नरेंद्र जनबंधू,श्री. गुरुदास नवले तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.