Home चंद्रपूर दखलपात्र:- ट्रक चोरी प्रकरणी तहसीलदार सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

दखलपात्र:- ट्रक चोरी प्रकरणी तहसीलदार सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

सुरेश तेलंग या तहसील कर्मचाऱ्यांनी सांगितले स्पष्ट, ट्रक सोडण्यासाठी 60 हजार रुपये तहसीलदार सोनवणे यांना दिल्याची कबुली?

भद्रावती प्रतिनिधी :-

तालुक्यातील तिरवंजा येथील अवैध गौण खनिज चोरी प्रकरणात तहसीलदार यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप होत॑ असतांनाचं आता चक्क तहसील कार्यालयातून ट्रक सोडण्यासाठी तहसील च्या शिपायामार्फत तहसीलदार सोनवणे यांनी 60 हजार रुपये घेऊन ट्रक सोडल्याची चर्चा होती. मात्र यासाठी प्रत्यक्ष शिपाई तेलंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी ट्रक मालकांनी दिलेले पैसे हे तहसीलदार सोनवणे यांना दिल्यानेचं ट्रक सोडला असे स्पष्ट केले आहे, यावरून ट्रक चोरीच्या प्रकरणात तहसीलदार यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी सर्वत्र होत॑ आहे. दरम्यान पोलिसांनी तहसीलदार सोनवणे व शिपाई तेलंग यांचे कॉल डिटेल्स घेतले तर याचा उलगडा होऊ शकतो, कारण कुठलाही अधिकारी हा लाच च्या रूपाने. मिळणारे पैसे स्वतः घेत नाही तर त्याच्या बाबू किंव्हा शिपाई यांच्या मार्फतचं घेतो त्यामुळे सुरेश तेलंग यांनी घेतलेले 60 हजार रुपये हे तहसीलदार सोनवणे यांना देण्यासाठीच घेतले होते व ते पैसे त्यांना दिले असल्याची कबुली खुद्द तेलंग यांनी पोलीस स्टेशनं मध्ये पत्रकारांसमोर केल्याने तहसीलदार सोनवणे यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो असे बोलल्या जातं आहे.

भद्रावती तहसील कार्यालयात ट्रक चोरीचे किंव्हा फाईन न लावता गाड्या सोडल्याचे हे पहिले प्रकरण नसून या अगोदर सुद्धा काही गाड्या सोडल्याच्या घटनांचे पुरावे समोर येणार आहे. दरम्यान सुरेश तेलंग यांनी सुद्धा पहिल्यांदा असे पैसे घेऊन वाहन सोडले नसून त्या अगोदर सुद्धा तहसीलदार सोनवणे यांच्याकडे आरोपीची रसद पोहचवून गाड्या सोडल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे ट्रक चोरी गेल्याची तक्रार जी त्या तहसील कार्यालयातील कर्मचारी असलेल्या गजानन क्षीरसागर यांनी भद्रावती पोलीस स्टेशन मध्ये केली त्या प्रकरणात चार आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपींना कारागृहात जावे लागले होते. या प्रकरणी आता त्या सर्वांना न्यायालयातून जमानत मिळणार असुन तहसीलदार सोनवणे यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

असाच एक हायवा ट्रक सोडला?

तहसीलदार सोनवणे यांच्या भ्रष्ट कहाण्या ह्या मोठ्या रंजक असुन तालुका न्यायदंडाधिकारी म्हणून आपली न्यायिक भूमिका बजावण्याची जबाबदारी असतांना उलट ते पैसे घेऊन दंड वसूल न करता गाड्या सोडून देतात अशी एक घटना मे जून च्या दरम्यान घडली होती अशी माहिती आहे. त्या गाडीचा क्रमांक MH34-BZ5558 असुन त्याचा दंड भरला नव्हता अशी चर्चा होती, मात्र तो रहस्यमयरीत्या हायवा ट्रक गायब झाला असल्याचे बोलल्या जातं आहे. यावरून तहसीलदार सोनवणे वरील प्रकरणात सुद्धा गुंतले असल्याचे निष्पन्न होत॑ आहे.

शामकांत थेरे प्रकरण सुद्धा तहसीलदार सोनवणे यांना भोवनार?

भद्रावती तहसीलदार सोनवणे हे दोन वर्षांपूर्वी रुजू झाल्यापासून त्यांचे अवैध रेती व गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफियासोबत अर्थपूर्ण संबंध असल्याचे बोलल्या जातं आहे. दरम्यान छोट्या ट्रॅक्टर्स व ट्रक वाल्यांना पकडायचे आणि मोठ्या तस्करांकडून पैसे घेऊन त्यांना अभय द्यायचा असा नित्यक्रम तहसीलदार सोनवणे यांनी चालवला असतांना मौजा तिरावंजा येथील दोन साजात असलेल्या महसूल विभागाच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन झाल्याची व कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवला गेल्याची घटना उजेडात आल्यानंतर या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात तहसीलदार यांचा सहभाग दिसतं असल्याने व त्यामुळेचं आरोपी शामकांत थेरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये ते तक्रार देत नसल्याने हे प्रकरण त्यांना भोवनार असुन त्यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. शामकांत थेरे व तहसीलदार सोनवणे यांचे कॉल डिटेल्स जर मागविले गेले तर हा गुंता सुटू शकतो. दरम्यान कमी काळात कोट्याधीश बनण्याच्या नादात आपल्यां पदाचा दुरुपयोग करून राष्ट्रीय संमतीची चोरी करण्यात सहभागी तहसीलदार सोनवणे यांच्यावर देशद्रोह सारखा गंभीर गुन्हा सुद्धा विभागीय चौकशीनंतर दाखल होऊ शकतो असे जाणकारांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here