Home चंद्रपूर तीर्थक्षेत्र वढा यात्रेतील भाविकांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन

तीर्थक्षेत्र वढा यात्रेतील भाविकांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन

तीर्थक्षेत्र वढा यात्रेतील भाविकांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :- चंद्रपूर कार्तिकी एकादशी निमित्त वढा येथे भरलेल्या यात्रेला विठ्ठल रुक्खमाईच्या दर्शनाला आलेल्या भाविकांसाठी यंग चांदा ब्रिगेच्या वतीने महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घूग्घुस पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक बोडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी वढाचे सरपंच किशोर वरारकर, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुनिल निखाडे, यंग चांदा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष मारोती नक्षीणे, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण शहर संघटक मुन्ना जोगी, विलास बोरकर, सतीश ताजने, छोटा नागपूरचे उपसरपंच रिषब दुपारे, अमित जोगी, संतोष भाईजे आदींची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही विदर्भाचे पंढरपूर समजल्या जाणारा वढा येथे कार्तिकी एकादशी निमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या यात्रेला विदर्भासह राज्याबाहेरील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत विठ्ठल रुक्ख्माईचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांच्या सोयी सुविधेसाठी मंदिर प्रशासन व ग्रामपंचायतच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. तर यंग चांदा ब्रिगेडच्या ग्रामिण आघाडीच्या वतीने येथे येणा-या भाविकांसाठी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी आलेल्या भाविकांना महाप्रसाद वाटप केला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Previous articleदखलपात्र:- ट्रक चोरी प्रकरणी तहसीलदार सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल होणार?
Next articleअवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना साद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here