Home चंद्रपूर श्री. नवयुवक बाल गणेश मंडळ, दत्त नगर, नागपूर रोड चंद्रपूर ने प्राप्त...

श्री. नवयुवक बाल गणेश मंडळ, दत्त नगर, नागपूर रोड चंद्रपूर ने प्राप्त केला प्रथम क्रमांक

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  चंद्रपूरचे पालकमंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याद्वारे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2023 चे बक्षीस वितरण गांधी चौक चंद्रपूर येथे पार पडले या घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये अनेक मंडळांनी सहभाग घेतला या सर्व मंडळांमध्ये दत्तनगर नागपूर रोड चंद्रपूर येथील श्री नवयुग बाल गणेश मंडळाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

या मंडळांनी यावर्षी थर्माकोल व प्लास्टिक विरहित पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा केला या द्वारे विविध विषय मंडळाद्वारे मांडण्यात आले त्यामध्ये सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अंधश्रद्धा निर्मूलन, कापडी पिशवीच्या वापर, सेंद्रिय शेती, मेरी माटी मेरा देश अंतर्गत देखावा,

तसेच प्लास्टिक मुळे होत असलेल्या गोमातेच्या मृत्यू असे विविध विषय व त्यासोबतच 350 व्या श्री शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राजगडाची आकर्षक कलात्मक प्रतिकृती देखावाच्या स्वरूपात सादर करत या मंडळांनी यावर्षी या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला

नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते ५१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन या मंडळाच्या सन्मान करण्यात आला मंडळाने मागील चार वर्षापासून ची आपली प्रथम क्रमांकाची परंपरा कायम ठेवल्यामुळे सर्व परिसरातील जनतेने मंडळाचे खूप खूप अभिनंदन केले आहे

Previous articleधक्कादायक :- भर रस्त्यात ठाणेदार अंबोरे यांनी ट्रॅव्हल्स चालकास केले रक्तबंबाळ.
Next articleगणपती बाप्पा मोरया’ या जयघोषात जात-पात विरहित समाजाचे वर्णन – ना.सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here