Home ब्रम्हपुरी धक्कादायक :- भर रस्त्यात ठाणेदार अंबोरे यांनी ट्रॅव्हल्स चालकास केले रक्तबंबाळ.

धक्कादायक :- भर रस्त्यात ठाणेदार अंबोरे यांनी ट्रॅव्हल्स चालकास केले रक्तबंबाळ.

ठाणेदार अंबोरे यांचे कारनामे नेहमीच चर्चेत, पोलीस अधीक्षक कारवाई करतील का?

चंद्रपूर /ब्रम्हपुरी :-

पोलीस विभागाचे काही अधिकारी ”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य जणू विसरले असल्याची परिस्थिती दिसतं असुन त्यांना मिळालेली वर्दी ही लोकांच्या संरक्षणासाठी असल्याची जाणीव ते विसरले आहे व त्या वर्दीचा दुरुपयोग करून ते स्वतःला श्रेष्ठ समजायला लागले आहे. मात्र त्यातून सर्वसामान्य जनतेवर जो त्यांच्याकडून अन्याय केला जातो त्यांवर प्रतिबंध कसा लागेल हा चिंतेचा व चिंतनाचा विषय ठरत आहे.

ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुधाकर अंबोरे हे नेहमीच विवादात राहणारे व “मेरीचं गिनो” या व्रुत्तिचे असुन चंद्रपूर जिल्ह्यात प्रदीर्घ काळ त्यांनी नौकरी केली त्या काळात त्यांच्यावर अनेक आरोप लागले व त्यांच्या विरोधात न्यायालयात पण दाद मागण्यात आली. दरम्यान नुकताच त्यांनी मोठा कारनामा केला असुन एका ट्रॅव्हल्स चालकाच्या डोक्यावर दांडूक्याने त्यांनी प्रहार करीत त्याला रक्तबंबाळ केल्याची धक्कादायक घटना सोमवारी ब्रमुपुरी येथील ख्रिस्तानंद चौकात घडली.

गडचिरोली कडून नागपूर कडे जाणाऱ्या MH 49 AT3625 नंबर ची ट्रॅव्हल्स रेल्वे फाटक बंद असल्याने थांबली होती. दरम्यान ठाणेदार अंभोरे हे MH 29 AR8855 खासगी वाहनाने ब्रम्हपुरी कडे येत होते. ट्रॅव्हल्स च्या डाव्या बाजूने कार पुढें नेत ट्रॅव्हल्स ला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र ते गणवेशात नसल्याने ट्रॅव्हल्स चालक मोहन अडविकर यांनी ट्रॅव्हल्स त्या ठिकाणी न थांबवता ख्रिस्तानंद हॉस्पिटल चौकात थांबवली असता त्याला ठाणेदार अंभोरे यांनी दांड्या ने मारहाण केल्याचा आरोप पीडिताने केला आहे.

पीडितानी मारहाणीची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन मध्ये दिली असता ती तक्रार तेथील उपस्थित स्टेशन डायरी अधिकारी यांनी घेतली नसल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी मार्फत पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या कडे तक्रार केली आहे. या आधीही अंभोरे यांच्यावर एल सी बी ला असताना ट्रॅफिक कार्यालयाच्या बाजूला चंद्रपुरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याला त्यांनी मारहाण केली होती. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देण्यात आली होती.त्याच वेळी अंभोरे यांची एल सी बी पोलिस निरीक्षक पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. सेवानिवृत्त होण्या करिता काही दिवसे शिल्लक असताना त्यांनी केलेला हा कारनामा त्यांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर पाणी फेरणारा ठरणार का व या संदर्भात पोलीस अधीक्षक त्यांच्यावर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleलक्षवेधक :- सिटीपीएस प्रशासन कंत्राटदार अनिल डोंगरे यांच्यावर  कारवाई करणार ?
Next articleश्री. नवयुवक बाल गणेश मंडळ, दत्त नगर, नागपूर रोड चंद्रपूर ने प्राप्त केला प्रथम क्रमांक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here