Home चंद्रपूर लक्षवेधक :- सिटीपीएस प्रशासन कंत्राटदार अनिल डोंगरे यांच्यावर  कारवाई करणार ?

लक्षवेधक :- सिटीपीएस प्रशासन कंत्राटदार अनिल डोंगरे यांच्यावर  कारवाई करणार ?

४० हजार झाडे लावण्याचे कंत्राटं घेऊन पाच टक्केही झाडं न वाचविणाऱ्या डोंगरेनी 54 लाख उडवले?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

सिटीपीएस कंपनी ही जणू घोटाळ्याची कंपनी आहे की काय असाच एकूण प्रकार दिसतं असुन श्रीराम एंटरप्रायजेस चे संचालक अनिल डोंगरे यांनी ४०हजार झाडे लावण्याचे व त्यांचे संगोपन करण्याचे कंत्राटं घेतले, पण त्यापैकी 5 टक्के ही झाडे वाचली नसल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर सिटीपीएस कंपनीच्या मुख्य अभियंता व त्या विभागाच्या अभियंता आणि अधिकारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत॑ आहे.

पर्यावरण संतुलन राखण्याच्या नावाखाली सन २०१८ मध्ये ४० हजार झाडे लावण्याचे कंत्राटं श्रीराम एंटरप्रायजेस कंपनीच्या अनिल डोंगरे यांना मिळाले होते, व त्यांचे तीन वर्षांसाठी संगोपन पण करायचे होते पण सिटीपीएस परिसरातील कचराळा परिसरात लावलेली ही झाडे पूर्णता मेली असुन ५ टक्के सुद्धा झाडे शिल्लक राहिली नाही, त्यामुळे भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर याबाबत बातमी झळकली आणि कंत्राटदार व संबंधित अभियंता यांचे धाबे दणाणले. दरम्यान संपादक यांना कंत्राटदार यांनी फोन करून या प्रकरणी मी जबाबदार नसून सिटीपीएस चे अभियंता जबाबदार आहे असे म्हटले होते, त्याबाबत त्यांनी खुलासा देत कंपनीने पाण्याची सुविधा करून दिली नाही त्यामुळे झाडे जगली नाही असे म्हटले होते, पण ज्याअर्थी अनिल डोंगरे यांना झाडे जगविण्यासाठी कंत्राट मिळाले तर पाण्याची सुविधा सुद्धा त्यांनीच करायला हवी होती पण तीं त्यांनी केली नाही व त्यांनी ९५ टक्के झाडे मारली ही वस्तुस्थिती असतांना याबाबत कार्यकारी अभियंता उरकुडे यांनी कंत्राटदार अनिल डोंगरे यांचे दोन वर्षांच्या संगोपनाचे बिल दिले आहे, त्यामुळे सिटीपीएस प्रशासन व कंत्राटदार यांच्या संगनमताने झाडे लावण्याच्या नावाखाली जवळपास 54 लाख रुपयांची केवळ उधळपट्टी सिटीपीएस कंपनीने केली आहे.

चौकशी अहवाल कुठे लपला ?

40 हजार झाडे लावल्यानंतर त्यापैकी 5 टक्के सुद्धा झाडे जगली नाही त्यामुळे याबाबत भुमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर बातम्या प्रकाशित झाल्यानंतर सिटीपीएस प्रशासनाने यांची चौकशी केली असल्याची माहिती समोर पण त्या चौकशी अहवालात नेमकं काय दडलय ? आणि तो अहवाल कुठे लपला याबाबत संभ्रम असुन ज्यांच्याकडे स्वतः त्या कामाची पाहणी करण्याची जबाबदारी होती त्यांनाच जर चौकशी करण्याचे काम सोपवले जातं असतील तर चौकशी अहवाल सुद्धा तसाच गोलमाल असेल त्यामुळे कंत्राटदार अनिल डोंगरे जे भाजप चे मोठे पदाधिकारी आहेत व त्यांची राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे त्यांच्यावर कारवाई होईल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत॑ आहे.दरम्यान कंत्राटदार अनिल डोंगरे यांचे सिटीपीएस मधील कंत्राटं किती व त्यातून त्यांनी किती मालमत्ता जमवली यांची गोळाबेरीज केली तर इमानदारीचा बुरखा पांघरूण भ्रष्टाचार करणाऱ्या मोहन डोंगरे यांची पोलखोल होणार हे निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here