Home चंद्रपूर महानगरपालिकेतील उपद्रव शोध पथकाद्वारे प्लास्टीक जप्ती व सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर कारवाई

महानगरपालिकेतील उपद्रव शोध पथकाद्वारे प्लास्टीक जप्ती व सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर कारवाई

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

झोन क्र. १(अ), (३ब) येथे कारवाई करून १३,७०० रुपये दंड वसुली

चंद्रपूर  :-  चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छ चंद्रपूर सुंदर चंद्रपूर साठी खूप प्रयत्न करत आहे. आणि नुसते प्रयत्न नाही तर स्वच्छ आणि सुंदर चंद्रपुरासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्कीम आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करत आहे. नुसते नागरिकांपुरतेचं नाही तर चंद्रपुरातील सफाई कर्मचाऱ्यांची टीम सुद्धा खूप मेहनत घेत आहे. मग ते नाली साफ करणारे असो अथवा रस्त्यावरील झाडू मारणारे किंवा घंटागाडी वाले भरपूर अशी मेहनत घेऊन चंद्रपूर स्वच्छ व सुंदर  करत आहे.

तसेच चंद्रपुरातील महानगरपालिका स्वच्छ – सुंदर चंद्रपूर दिसाव्हा या साठी प्रयत्न करत आहे. आणि याच्यातीलच एक भाग म्हणून महानगरपालिकेकडून रस्त्यावरील घाण पसरवणाऱ्या व प्लास्टिकच्या वापर करणाऱ्या दुकानदाराना साठी चंद्रपुरातील महानगरपालिका मधील कर्मचाऱ्यांची उपद्रव शोध पथक टीम तयार करण्यात आलेली आहे.

प्रत्येक झोनमधून एक एक टीम तयार करण्यात आलेली आहे आणि हे टीम दिवसभर जो कोणी रस्त्यावरील कचरा टाकतात डस्टबिन यूज करत नाही व प्लास्टिक युज करतात अश्या दुकानदारांवनर कारवाई करण्याचे काम सध्या महानगरपालिकेत सुरू आहे. आज उपद्रव शोध पथकाद्वारे प्लास्टीक जप्ती तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर कारवाई करून झोन क्र. १(अ), (३ब) येथे कारवाई करून १३,७०० रुपये दंड वसुल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here