Home वरोरा एल्गार :- आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.

एल्गार :- आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.

हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर, अनुसूचित जमाती मध्ये धनगर व बंजारा समाजाचा समावेश केल्यास खबरदार.

वरोरा प्रतिनिधी :-

राज्यात सगळीकडे रक्षणाच्या नावावर अनेक मोर्चे आंदोलनं सुरू असुन एकीकडे मराठा समाज तर दुसरीकडे धनगर समाज आरक्षणासाठी मैदानात उतरला असतांना त्यांचा ओबीसी आणि एसटी मध्ये अनुक्रमे समावेश करू नये यासाठी ओबीसी आणि एसटी समाजाचे प्रतीआंदोलन होतांना दिसतं आहे. अशातच वरोरा येथे आदिवासी नेते रमेश मेश्राम व इतर नेत्यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा भव्य असा मोर्चा काल दिनांक 4 डिसेंबरला काढण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

स्थानिक रत्नमाला चौक ते गांधी चौक व्हाया आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयावर निघालेल्या या मोर्चात हजारो आदिवासी सामील झाले होते. अनुसूचित जमाती मध्ये धनगर व बंजारा समाजाचा समावेश केल्यास खबरदार असा इशारा सरकारला देऊन त्यांना आरक्षण देण्यासाठी जी समिती गठीत केली आहे ती समिती रद्द करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली. “आरक्षण आम्हच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.” ह्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता वरोरा येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत आरक्षणाच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल यांना आदिवासी समाज आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Previous articleचंद्रपूर जिल्ह्यातील फ्लाईंग क्लबचे काम वेगाने पूर्ण करा
Next articleमहानगरपालिकेतील उपद्रव शोध पथकाद्वारे प्लास्टीक जप्ती व सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here