Home चंद्रपूर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर 06 डिसें :-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बहुजन महिला विभागाच्या महिला शहर प्रमुख विमल काटकर, सविता दंडारे, सायली येरणे, निलिमा वनकर, कल्पना शिंदे, आशा देशमूख, अल्का मेश्राम, माधूरी निवलकर, कविता निखाडे, मंजुषा दरवरे, वंदना हजारे, रश्मी नागराळे, पपिता जुनघरे, ज्योती सिन्हा ,नाजी शेख, वैशाली मद्दीवार आदींची उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ शेकडो अनुयायी एकत्रीत आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच या निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातही आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous articleसरकारच्या चहापानावर बहिष्कार; महाविकास आघाडीची भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
Next articleगडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने महापरिनिर्वान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here