Home चंद्रपूर माणुसकी ग्रूप च्या सामाजिक कार्याची दखल घेत निराधार व भटकंती असहाय्य लोकांसाठी...

माणुसकी ग्रूप च्या सामाजिक कार्याची दखल घेत निराधार व भटकंती असहाय्य लोकांसाठी 100 गरम ब्लँकेटस् सुनिल देरकर कडून माणुसकी ग्रुप ला भेट

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर  :-  एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’  संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जे जे शक्य होईल ती ती मदत आपण केली पाहिजे.याच अभिवाचना वर चालत चंद्रपुरातील सुनील देरकर यांनी आज माणुसकी ग्रूप ला 100 गरम ब्लँकेटस निराधार व भटकंती असहाय्य लोकांसाठी मदत म्हणून दिले.

काही दिवसांपूर्वी सुनील देरकर यांनी माणुसकी ग्रूप च्या सामाजिक कार्याची दखल घेत टीम ला 100 गरम ब्लँकेटस् देण्याची इच्छा विशाल रामगिरवार यांच्या कडे बोलतांना दर्शविली होती, आणि  आज त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण करून दि,08, डिसेंबर ला नागपूर वरून परत येताना त्यांनी माणुसकी ग्रुप मधील विशाल रामगिरवार ला फोन करून सांगितले की विशाल पडोली चौकात तू ये आणि जेव्हा माणुसकी ग्रुप मधील सदस्य पडोली चौकात पोहोचले तर खरंच म्हणते ना

तुमच्या मनातील इच्छाशक्ती असायला पाहिजे एक हात मदतीचा  त्यांचे जागृत उदाहरण म्हणजे काल प्रत्यक्ष माणुसकी ग्रुपने अनुभवलेला कारण जो शब्द सुनील ने दिला होता तो त्याने पूर्ण केला 100, ब्लँकेटस् पडोली फाटा येथे माणुसकी ग्रूप च्या सुपूर्त करून. त्यांनी चंद्रपुरातील निराधार व बेसाहाय नागरिकांसाठी खूप मोठी मदत केली.म्हणून चंद्रपुरातील माणुसकी ग्रुपच्या संपूर्ण टीमने सुनील देरकर यांचे खूप खूप आभार मानले.

समाजसेवेसाठी ना जात ना पात, ना वेळ ना काळ बघत कोणत्याही परिस्थिती काम करणार माणुसकी ग्रूप ची संपूर्ण टीम आपल्या सेवेत कायम हजर राहणार आणि गोरगरीबांना मदत करत राहणार असा संदेश यावेळी सुनील देरकर यांना माणुसकी ग्रुपच्या संपूर्ण टीमने देत त्याच्या शुभेच्छा मानल्या

           माणुसकी ग्रुपच्या चंद्रपुरातील नागरिकांना संदेश

सुनील देरकर प्रमाणेच आपणास कोणत्याही प्रकारची निराधार व बेसाहारा नागरिकांसाठी मदत करायची असेल्यास किव्हा तुमचा वाढदिवस, एनिवर्सरी व कोणत्याही प्रकारचे विशेष प्रोग्राम गोरगरिबासोबत व मतिमंद लोकांनसोबत सेलिब्रेट करायचे असल्यास तर माणुसकी ग्रूप शी संपर्क करा. 🙏🏻
समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा
एक हाथ मदतीचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here