Home चंद्रपूर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे...

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे स्वागत

शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालया जवळ स्वागत करण्यात आले आहे. यावेळी रथयात्रेत सहभागी झालेल्या तैलिक समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने फळ व शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, सायली येरणे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, अल्पसंख्यांक विभागाच्या महिला शहर प्रमूख कौसर खान, आशा देशमूख, वैशाली मेश्राम, वैशाली मद्दीवार, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, हेरमन जोसेफ, शहर संघटक देवा कुंटा, ताहिर हुसेन, चंद्रशेखर देशमूख, विनोद अनंतवार, कार्तिक बोरेवार, जय मिश्रा, प्रतीक हजारे आदींची उपस्थिती होती.
तैलिक समाज घडविणारे तेली समाजाचे आराध्यदैवत, समाज सुधारक संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे आज तैलिक समाज बांधवांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जैन भवन जवळील कार्यालया जवळ स्वागत मंच उभारला होता. ही रथयात्रा यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचाजवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करत त्यांना नमन केले. सदर रथयात्रेत सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी येथे शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण*

तेली समाज बांधवांच्या वतीने जोडदेऊळ येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन नमन केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, राशिद हुसेन, प्रतिक शिवणकर, विश्वजीत शाहा, करणसिंह बैस आदींची उपस्थिती होती आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here