Home चंद्रपूर सावध व्हा गाफील राहाल्यास पुन्हा जनतेचे शोषण केले जाईल- डॉ. नामदेव किरसान

सावध व्हा गाफील राहाल्यास पुन्हा जनतेचे शोषण केले जाईल- डॉ. नामदेव किरसान

सावध व्हा गाफील राहाल्यास पुन्हा जनतेचे शोषण केले जाईल- डॉ. नामदेव किरसान

राजेंद्र मेश्राम

विषेश जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- मौजा मेहाखुर्द /मंगरमेंढा ता. सावली जि. चंद्रपूर येथे “खतरनाक” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले. नाटकाचे उदघाट्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली – चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. आपल्या उद्घाटकीय भाषणात डॉ. नामदेव कीरसान यांनी जनतेला सावध करताना सांगितले की अच्छे दिन येण्याचे आश्वासन ज्यांनी दिले होते त्यांचे कडून मोठ्या प्रमाणे महागाई व बेरोजगारी वाढवून सर्वसाधारण जनतेकडून मोठ्या प्रमाणावर कराची वसुली करून मूठभर पुंजी पतीचे घर भरले जात आहे. खोटी आश्वासनं देऊन जनतेची फसवणूक केल्या जात आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी सावध राहण्याची गरज आहे.
यावेळी दिनेश पा.चिटनुरवार माजी बांधकाम सभापती चंद्रपूर , मा. निखिल भाऊ सुरमवार संचालक कृ. उ . बा. स . सावली , प्राचार्य व्ही. लोखंडे सर, खुशाल भाऊ लोडे, वैभव गुज्जनवार, बंडूभाऊ बोरकुटे, प्रमोद पाटील दाजगाये, राजू वाघरे, श्रीकांत संगिडवार, मुक्तेश्वर मंगर पोलिस पाटील, चंदु नंदनवार, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले, वैशाली ताई मिसार, भास्कर मलोडे, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेषक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here