Home चंद्रपूर गावाच्या विकासाकडे जन प्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे – डॉ. नामदेव किरसान.

गावाच्या विकासाकडे जन प्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे – डॉ. नामदेव किरसान.

गावाच्या विकासाकडे जन प्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे – डॉ. नामदेव किरसान.

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- मौजा किरमिटी (मेंढा) ता. नागभिड जि. चंद्रपूर येथे श्री गुरुदेव सार्वजनिक नाट्य कला मंडळ किरमिटी च्या वतीने आयोजित “आभाळाची माया”या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ.नामदेव किरसान यांनी आपल्या उद्घाटकिय भाषणात जनतेला लोकप्रतिनिधींचे महत्त्व पटवून देतांना सांगितले की, जलप्रतिनिधींनी गावातील समस्या व गावकऱ्यांची गरज लक्षात घेता गावाच्या विकासाची कामं करणे गरजेचे आहे. तसेच आमदार खासदार सारख्या जनप्रतिनिधींनी लोकांच्या समस्यां, वाढती बेरोजगारी व महागाई, शेतकऱ्यांच्या न वाढणाऱ्या उत्पन्नाबाबत लोकसभेत व विधानसभेत प्रश्न उपस्थित करायला पाहिजे. जर ते समस्या सोडविण्यास व प्रश्न उपस्थित करण्यास सक्षम नसतील तर अश्या जनप्रतिनिधिंना मतं मागायला येतील तेव्हा विचारणा करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अध्यक्ष म्हणून सतीश भाऊ वारजुकर समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र,पुरुषोत्तमजी बगमारे साहेब कृ.उ.बा.स.संचालक, संजय माकोडे, रामकृष्णजी देशमुख माजी सरपंच मौशी, भूपेश कोरे, डॉ.हरीश मुळे, मोराडे सर, प्रतीक भसीन माजी नगरसेवक, रोशन ढोक, राजेंद्र मेश्राम, मान्यवर मंडळी व मोठया संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here