Home चंद्रपूर संताजी जगनाडे महाराज शोभायात्रेचे काँग्रेसकडून स्वागत

संताजी जगनाडे महाराज शोभायात्रेचे काँग्रेसकडून स्वागत

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर  :-  राष्ट्रसंत महाराज यांच्या मूळगाथेचे लेखनकर्ते, मानवता व लोककल्याणाची शिकवण देणारे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चंद्रपुरात तेली समाज बांधवांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. स्थानिक गांधी चौक येथे या शोभायात्रेचे स्वागत माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात युवा नेते राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

शोभायात्रेत संताजी जगनाडे महाराजांच्या पालखीचे पूजन राहुल पुगलिया व करण पुगलिया यांनी केले. त्यानंतर शोभायात्रेत सहभागी सर्व समाज बांधवांचे स्वागत करून शरबत वाटप करण्यात आले. याप्रसंगी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन गावंडे, शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले, अशोक नागापुरे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॅड. विजय मोगरे, चंद्रशेखर पोडे, महेंद्र जयस्वाल, सुधाकरसिंह गौर, दुर्गेश चौबे, बाबूलाल करुणाकर, नंदू मोगरे, हेमंत आक्केवार, सचिन गावंडे, अनंता हुड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here