Home चंद्रपूर डॉ. प्राजक्ता अस्वार विदर्भातील पहिल्या महिला फुल ‘आयरन मॅन’ ऑस्ट्रेलियामध्ये रोवला चंद्रपूरचा...

डॉ. प्राजक्ता अस्वार विदर्भातील पहिल्या महिला फुल ‘आयरन मॅन’ ऑस्ट्रेलियामध्ये रोवला चंद्रपूरचा झेंडा

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर   :-  ऑस्ट्रेलिया देशातील बसल्टन येथे नुकत्याच झालेल्या फुल आयरन मॅन स्पर्धेत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्राजक्ता अस्वार यांनी सहभाग घेऊन भरारी मारली आहे. जलतरण, सायकलिंग, रनिंग अशा तीनही स्पर्धेचे १७ तासांच्या आता गाठायचे अंतर जगातील तब्बल हजार व भारतातील २५ स्पर्धकांना मागे टाकत केवळ १३ तास ४५ मिनिटात गाठून विदर्भातील पहिल्या ‘आयरन मॅन’ ठरण्याचा बहुमान पटकावत ऑस्टेलियामध्ये चंद्रपूरचे नाव कोरले.

डॉ. प्राजक्ता अस्वार या चंद्रपुरात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. फूल आयरन मॅन स्पर्धेत जलतरण ३.८ किमी, सायकलिंग १८० किमी, रनिंग ४२ किमी अशा तीनही स्पर्धा एकूण १७ तासांत पूर्ण करायच्या होत्या. त्यांनी केवळ १३ तास ४५ मिनिटात त्या पूर्ण करून ‘आयरन मॅन’ या पुरस्काराला गवसणी घालून विदर्भातील पहिल्या महिला आयरन मॅन ठरल्या आहेत.

यापूर्वी त्यांनी हाफ आयरन मॅन, आयरन मॅन ७०.३ गोवा व जर्मनी येथे तसेच फिनफॅड येथे झालेल्या आयरन मॅन ७०.३ वर्ल्ड चॅम्पियनशिपसुद्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२४ मध्ये नागपूर येथे होणाऱ्या टायगर मॅन ट्रायथलॉन या स्पर्धेसाठी त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here