Home चंद्रपूर साहित्य वाटप करून मूळ समस्यांपासून लक्ष विचलित करू पाहणाऱ्या जनप्रतिनिधींना मतदान करू...

साहित्य वाटप करून मूळ समस्यांपासून लक्ष विचलित करू पाहणाऱ्या जनप्रतिनिधींना मतदान करू नका – डॉ. नामदेव किरसान

साहित्य वाटप करून मूळ समस्यांपासून लक्ष विचलित करू पाहणाऱ्या जनप्रतिनिधींना मतदान करू नका – डॉ. नामदेव किरसान

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-  दि,9 डिसें मौजा मौशी ता.नगभिड जि.चंद्रपूर येथे “बायको नंबर वन” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात आमिषे दाखवून मत मागणाऱ्या जनप्रतिनिधींवर ताशेरे ओढतांना सांगितले की, काही जनप्रतिनिधी लाडू, चिवडा, मंगळसूत्र, कुकर अशा प्रकारचे साहित्याचे वाटप करतात व जनतेच्या महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था व अशा अनेक मूळ समस्या विसरायला भाग पाडून मतं लाटण्याचं काम करतात करिता सावधगिरी बाळगून कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रतिनिधींना मतदान करू नये तसेच सर्वसामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन 11 डिसेंबर 2023 रोजी नागपूर विधान भवनावर आयोजित केलेल्या हल्लाबोल मोर्चात सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अध्यक्ष म्हणून मा.श्री.सतीशभाऊ वारजूरकर समन्व्यक चिमूर विधानसभा, विनोदभाऊ बोरकर, माजी जि. प. सदस्य खोजरामजी मरसकोल्हे, माजी प.स.सभापती श्री भाऊरावजी पांडव, कमलाकरजी ठवरे सरपंच सं.अध्यक्ष, श्री.मोरेश्वरजी देशमुख, श्री.रुपेशजी टिकले, रामकृष्णजी देशमुख, पटवारीजी देशमुख, भाऊरावजी पांडव, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेसक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here