Home चंद्रपूर नागपूर दुर्घटना :मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला...

नागपूर दुर्घटना :मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

नागपूर दुर्घटना :मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी.

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-नागपूर १७ डिसें, नागपुरात आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर-अमरावती रोडवर बाजारगाव येथे ही कंपनी आहे. या कंपनीत स्फोट झाला असून या प्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी अशी मागणी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी
नागपूर येथील कंपनी सोलार इंडस्ट्रीज मध्ये झालेल्या स्फोटात ६ महिलांसह ९ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. दुर्घटनेतील मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी ही आमची मागणी आहे.

कंपनी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. यापूर्वी सुद्धा अश्या घटना सदर कंपनीत घडल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच कंपनीमुळे परिसरातील पर्यावरणाचे होत असलेले नुकसान ही गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.
सरकारने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन एसआयटी स्थापन करावी आणि दोषी असलेल्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here