Home चंद्रपूर खळबळजनक :- रेती घाटावर पोकलेन मशीन पकडल्यावर का सोडली ?

खळबळजनक :- रेती घाटावर पोकलेन मशीन पकडल्यावर का सोडली ?

गोंडपिपरी च्या विठ्ठलवाडा रेती घाटावर उपविभागीय अधिकारी यांची धाड निष्फळ ठरली का ?

चंद्रपूर :-

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठल वाडा या घाटावर पोकलेन मशीन द्वारे अवैध उत्खनन होत असल्याची माहिती गोंडपिपरी येथील उपविभागीय अधिकारी यांना काल दिनांक 18 डिसेंबर ला मिळाली असता त्या माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या ताफ्यासह गोंडपिपरी येथील पोलीस निरीक्षक यांना घेऊन घटनास्थळ गाठले. या दरम्यान त्यांना रेती घाटाजवळ पोकलेन मशीन असल्याचे निदर्शनास येताचं त्यांनी सदर मशीन सायंकाळच्या सुमारास पाच वाजता जप्त केली, सदर मशीन ही राजुरा येथील अमजद खान यांची असल्याची माहिती समोर येत आली. या घटनेची गोंडपिपरी परिसरात चर्चा सुरू झाली मात्र त्या अगोदरच काय तडजोड झाली कुणास ठाऊक पण प्रकरण थंड बस्त्यांत टाकल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दरम्यान अमजद खान यांनी परवानगी नसतांना चक्क रेती घाटातून रेती काढण्यासाठी पोकलेन मशीन वापरली आणि उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाई थांबवली हे जरा महसूल विभागाची गोची करणारी बाब असल्याची चर्चा आहे.

जिल्ह्याचे महसूल प्रशासन शासनाचा महसूल वाढवत आहे की तो बुडवून स्वतःचे खिसे भरत आहे हेच कळायला मार्ग नसून स्वतःचे निर्णय स्वतःच फिरवून रेती माफियांचा जणू फायदा पोहचवून देण्याचा निर्णय महसूल प्रशासन घेत आहे. दरम्यान रेती घाटातील उत्खनन व साठवणूक यांची मुद्दत संपल्यानंतर जिल्हाधिकारी व खनिकर्म अधिकारी यांनी 10 नोव्हेंबर ही शेवटची रेती साठा उचलण्याची तारीख ठरवली होती व त्यानंतर असलेला रेती साठा शासन जमा होईल असा निर्णय दिला होता. परंतु आता जिल्हाधिकारी व खनिकर्म अधिकारी यांना कुठला साक्षात्कार झाला कुणास ठाऊक पण त्यांनी रेती माफियांचा रेती साठा जप्त न करता आता तब्बल एक महिन्यांनंतर कोट्यावधी रुपयांचा रेती साठा उचलण्याची मुभा रेती घाट धारकांना देऊन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविला आहे.

खनिकर्म विभागाची कारवाई की लुबाडणूक?

चंद्रपूर च्या दुर्गापूर सब एरिया ऑफीस समोर रेती वाहतुक करणारे दोन हाफटन वाहन खनिकर्म विभागाचे अधिकारी यांनी शनिवारी सकाळी ८.३० वाजता पकडले व नंतर पैसे घेऊन सोडून दिले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. सदर वाहन हे राकेश सिंग, राजू झरकर यांचे असल्याची चर्चा असुन त्यांनी खनिकर्म अधिकाऱ्यांना ४० हजार रुपये दिल्याचे समजते. दरम्यान महसुल व खनिकर्म अधिकाऱ्यांच्या लाचखोरीमुळे रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असुन महसूल व खनिकर्म अधिकाऱ्यांची रेती माफिया कडून लुबाडणूक सुरू आहे का ? व शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविण्याचा यांना ठेका मिळाला आहे का ? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. खनिकर्म विभागाचे अधिकारी नैताम यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी व उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्या संपत्तीची चौकशी होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here