Home Breaking News कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेडच्या विरोधात महिलांचा एल्गार उपोषणाचा 7 वा दिवस, 25...

कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेडच्या विरोधात महिलांचा एल्गार उपोषणाचा 7 वा दिवस, 25 डिसेंबरपासून बेमुदत उपोषण,व सामूहिक आत्मदहनाचा इशारा

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

भद्रावती  :-  कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेडच्या विरोधात बरांज मोकासा येथील महिलांनी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी 7 दिवस लोटून सुद्धा त्यांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे 25 डिसेंबर पासून बेमुदत उपोषणाचा इशारा महिलांनी दिला आहे. शेवटी मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्महत्या करू असेही त्यांनी यावेळी सांगितले,

बरांज मोकासा या गावातील दीडशेच्या वर महिला पुनर्वसन प्रकल्पग्रस्त महिला संघटना बरांज मोकासा या नावाने आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

निर्जनस्थळी आंदोलन सुरू असताना सुद्धा महिलांना पोलिस संरक्षणच का दिले नाही?

उपोषण हे खाण परिसरातील निर्जनस्थळी सुरू आहे. पोलिस संरक्षणाची मागणी करून सुद्धा ती दिली गेली नसल्याचे या महिलांनी यावेळी सांगितले. उपोषणकर्त्या महिलांसोबत काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असे त्यांनी सांगितले. या महिला आपल्या घरातील काम धंदे व मोल मजुरी सोडून आंदोलनात सहभागी झाल्या आहे.

सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकांच्या उपस्थितीत  ठराव घेण्यात आले.

त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2014 मध्ये ही खाण बंद झाली. नंतर ती सन 2020 ला सुरू झाली. परंतु खाण बंद असताना 15 सप्टेंबर 2016 ला करारपत्र झाले. त्यात प्रकल्पग्रस्तांना अत्यल्प मोबदला देण्याची तरतूद केली होती. सदर करार मान्य नसल्याचे या सभेने ठरविले होते. व तो करार रद्द करून नवीन करार करा असे सभेत ठरविण्यात आले.

तसेच गावाचे पुनर्वसन प्रकल्पग्रस्त गावापासून आठ किलोमीटर अंतरावर नागपूर चंद्रपूर मार्गावर करणे, नोकरी करू इच्छिणाऱ्या प्रकल्पग्रसस्तांना कर्नाटका पावर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीत कायमस्वरूपी नोकरी, वेकोलीच्या वेतनानुसार वेतन, कार्यरत कामगाराचा खाणीत मृत्यू झाल्यास 30 लाख आणि बाहेर झाल्यास 20 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

गेल् अनेक वर्षांपासून निवेदने दिले व आंदोलने करून सुद्धा आतापर्यंत येथील महिलांना व नागरिकांना आश्वासना व्यतिरिक काहीच मिळाले नसल्याने अखेर आता शेवटच्या भाग म्हणून येथील सर्व महीलाने आता साखळी उपोषण त्यानंतर बेमुदत आंदोलन आणि नंतर सामुहिक आत्मदहनाच्या विचार करून या महिला आता उपोषणाला बसलेल्या आहे. उपोषणाला बसणाऱ्या मध्ये महिला शोभा बहादे, पंचशील कांबळे, पल्लवी कोरडे, ज्योती पाटील मीरा देहारकर, माधुरी निखाडे, माधुरी वाट यांनी सांगितले. यावेळी गावातील दीड महिला उपस्थित होत्या. या आंदोलना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल सहसचिव राजू गैनवार यांनी लिखित पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here