Home Breaking News चंद्रपुरातील माणुसकी ग्रुप कडून गेल्या दोन महिन्या अगोदर जटपुरा गेट परिसरात बेसहारा...

चंद्रपुरातील माणुसकी ग्रुप कडून गेल्या दोन महिन्या अगोदर जटपुरा गेट परिसरात बेसहारा मानसिक मनोरुग्ण आज पूर्णपणे मानसिक आजाराने मुक्त (दुरुस्त) होऊन आपल्या गावी परतला

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  दिनांक 27/10/2023 लां जटपुरा गेट जवळ रामनगर रोड परिसरात एक बेसहारा मानसिक मनोरुग्ण एक पाय तुटलेला आणि दुसऱ्या पायाला दुखापत होऊन किडे लागलेले अवस्थेत एक पॉलीटेकनिक विध्यार्थी साईप्रीत चकीनारपवार यांना दिसलां त्यांनी लगेच माणुसकी ग्रुप मधील सुशांत धकाते यांना कॉल करून माहिती दिली. त्यांनी लगेच टीम मधील विशाल रामगिरवार लां घेऊन 15 ते 20 मिनिटात आम्ही तिथे पोहचलो. नंतर लगेच प्रायव्हेट ऍम्ब्युलन्स बोलावून त्यांना सरकारी हॉस्पिटल लां नेण्यात आले.

नंतर भरती करतांना डॉक्टरानी आम्हांला म्हटलं कि त्यांचं नाव, गांव, त्यांच नातेवाईक नसल्यामुळे आम्ही त्यांना भरती करू शकणार नाही, आणि मानसिक दुखापत व्यक्तींना पेशन्ट सोबत एक व्यक्ती असणे आवश्यक असेल तर आम्ही त्यांना भरती करू असे डॉक्टर सांगितल्यावर सरकारी हॉस्पिटल मधील समाज सेवक अधीक्षक झलके यांना कॉल केल आणि डॉक्टर शी कॉल वर बोलण करून दिल्यावर त्या पेशन्ट लां तुरंत ट्रेंटमेन्ट करन्यास सुरवात केली आणि डॉक्यूमेन्ट प्रोसेस करता वेळी सुशांत धकाते आणि झलके यांनी पूर्ण पेशन्ट बरा होये पर्यत जीमेदारी हाती घेतली.

नंतर त्यांचा घरचा पत्ता दिनांक 29/10/2023 लां लागला आणि त्यांची पत्नी विदया खडसे काकूंना बोलवण्यात आलं आणि त्यांची आर्थिक परिस्तिथी खूप खराब असल्याचे कडले. आमची संपूर्ण माणुसकी टीम नी त्यांना आधार देऊन त्यांना हॉस्पीटल लां पेशन्ट बरा होई पर्यत राहायला सांगितलं जे काही तुम्हाला मदत लागेल ते आम्ही करू आणि ते राहायला तयार झाल्या…

3 ते 4  दिवस हॉस्पिटल लां असतांनी पायाचा घाव बसायला सुरवात झाली आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्यात आली. तर लगेच त्यांच्या पत्नीने माणुसकी ग्रुप मधील सुशांत धकाते यांना कॉल केला आणि सांगितलं कि पेशन्टचे मानसिक आजार बरे नाही झाले आहे. तर यांना मी घरी कसे नेऊ आणि गावाकडले लोक त्यांना राहू देत नाही व यांच्या सोबत आम्हाला पण गाव सोडून जायला सांगितलं होते पण यांना मी खूप दा हॉस्पीटल लां ट्रेंटमेन्टसाठी आणलं पन ते मानसिक आजाराने एका जागी थांबत नव्हते.

आणि ते असं करता करता कुठे गेलं कि पत्ता लागलेलं नाही आणि त्यांचा मुलगा पण वारला (मरण पावलं) असे खूप काही त्यांचा बितलेली मनातली परिस्तिथी सांगून रडायला सुरवात केली. मला खूप दुःख वाटलं 1-2 तास कॉल वर बोलून मी झलके यांना सांगितलं मग झलके यांनी वॉर्ड no.5 लां जाऊन डॉक्टराशी बोलून विंनती केली कि मनोरुग्णची तब्बेत दुखापत आजारानीं बर होत असेल. तरी तुम्ही मानसिक इलाज साठी वॉर्ड चेंज करू शकतात पण त्यांची सुट्टी रद्द करण्यात यावी मन्हून विनंती केली. त्यांच्या या विनंतीला यश आले आणि येथील डॉक्टरांनी त्यांना मानसिक वॉर्ड no.6 लां ठेवले. आणि झलके यांच्या बोलण्यानुसार समोरील  ट्रेंटमेन्ट करण्यास सुरवात झाली.

काही दिवसांनी झलके आणि सुशांत धकाते त्यांना भेटायला यायचे आणि खडसे काकूंना खूप बर वाटायचं आणि असं करता करता 1 महिना लोटून गेला आणि पेशन्ट मानसिक आजाराणी बरा होण्यास सुरवात झाली. तो हळू हळू छान बोलायला सुरवात केली. नंतर 2 महिने झाले आणि पेशन्ट पूर्णपणे मानसिक आजाराने मुक्त (दुरुस्त)खूप छान झाला.

आणि त्यांनी स्वस्ता बोलून झलके व माणुसकी टीम मधील सुशांत धकाते, विनोद पेनलिवार नां खूप खूप आभार मानून धन्यवाद दिले आणि त्यांची पत्नी विदया खडसे नी म्हटलं कि आज देवा सारखे तुम्ही समोर येऊन माझा नवर्याचे प्राण वाचून जे तुम्ही केल ते माझ्या स्वतःच्या कोणतेही रॅलेटिव्ह किंवा गावाचा एकाही व्यक्तीने केल नाही. मंदिरात देव दिसले नाही जे आज मला माणसात देव सापडलं असं मन्हून त्यांनी गावी जाण्यास सुरवात केली….

 

              माणुसकी ग्रुपने मानले आभार

सर्व प्रथम समाज सेवक अधीक्षक झलके यांनी योग्य तो ट्रेंटमेन्ट पर्यत त्यांना मदत करून सहकार्य केल्याबद्दल संपूर्ण माणुसकी टीम यांचे मानले आभार….

यांची मानसिक व दुखापत योग्य प्रकारचा दिलेली डॉक्टर आणि नर्स नावे

डॉ. साची बंग (Assist. Prot. डॉ. प्रियंका मून (senior recident) डॉ. रुपेश (senior recident) डॉ. इंद्रजित कुमार(JR-2) डॉ. रुचिता मुळे(JR-2) डॉ. नेहा पसिने(JR-1) डॉ. इरील मिश्रा (JR-1) अक्षय राऊत (dresser) वर्षा रामटेके (स्टाफ नर्स) अक्षय राऊत(वॉर्ड बॉय) राकेश शेंडे (अधीक्षक)

या सर्व डॉक्टरांनीं मानसिक मनोरुग्ण व्यतिला योग्य ट्रेंटमेन्ट करून 2 महिन्यातच बर केल आज संपूर्ण डॉक्टरनां खूप खूप धन्यवाद

माणुसकी हीच खरी ईश्वर सेवा
मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपनी मदतीचा हात दया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here