Home चंद्रपूर त्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना,”विजुभाऊंचा” आधार सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत

त्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना,”विजुभाऊंचा” आधार सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत

त्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना,”विजुभाऊंचा” आधार

सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-२२डिसें,2023 तालुका सावली राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मंत्री तथा सावली ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार ह्यांनी अंगीकरलेले जनसेवेचे व्रत हे सर्वपरिचित आहे,काल तालुक्यातील मौजा.पालेबारसा येथे सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आरोग्य तपासणी ,डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी कॅन्सरग्रस्त रुग्णांना मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत देण्यात आली,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर व कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे संचालक मा.खुशाल लोडे यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.*

*तालुक्यातील मौजा.आकापुर येथील सुधाकर तिमाजी मेश्राम वय ४८ वर्ष व श्रीमती ताराबाई चंद्रकांत डोमळे वय ४६ वर्षे तसेच मौजा.उसरपार चक येथील कु.विद्या ठेमदेव नेवारे वय २८ वर्षे हे तिन्ही रुग्न तबेत खराब राहत असल्यामुळे उपचार घेत होते, मात्र घरातील आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे मिडेल ते काम करून कसाबसा कुटुंबाचा उर्दनिर्वाह करीत होते, उपचारा दरम्यान त्यां तिन्ही रुग्णांना कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले घरातील कर्त्या व्यक्तीवर संकट ओढवले असताना पुढील उपचाराकरिता आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांच्याकडे संपर्क केला असता त्यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर रुग्णांना आर्थिक मदत मिळवून दिली.*

*आर्थिक मदत देताना पालेबारसाच्या सरपंच सौ.मंदाबाई मडावी,उपसरपंच मा.रमेश खेडेकर,माजी उपसभापती प.स.सावली मा.राजेंद्र भोयर,माजी सरपंच पालेबारसा मा.विलास कावळे,माजी सरपंच सायखेडा मा.जीवन चौधरी,माजी सरपंच मा.प्रकाश खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.सुलोचना वाघरे,युवक काँग्रेस उपाध्यक्ष मा.सुशील डहलकर,माजी तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष मा.वैभव गुज्जनवार व मा.पंकज कागदेलवार,तसेंच काँग्रेस कार्यकर्ते मा.आकाश येणप्रेडिवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.लोखंडे सर,मा.प्रशांत मलोडे,मा.हेमंत धुर्वे,माजी उपसरपंच मा.प्रभाकर गुरुनुले, मा.अंकुश येणप्रेडिवार,मा.श्रीकांत सांगिडवार,मा.कांशीराम दाजगाये,मा.रमेश तिवाडे, मा.विठ्ठल मंगर,मा.बादल गेडाम, यांच्या सह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व बहुसंखेने नागरिक उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here