Home चंद्रपूर संतापजनक :- विठ्ठलवाडा रेती घाटातून अमजद ची अवैध रेती उत्खनन जोरात?

संतापजनक :- विठ्ठलवाडा रेती घाटातून अमजद ची अवैध रेती उत्खनन जोरात?

रेती घाटातून कोट्यावधी रुपयाची रेती चोरी होतं असताना अमजद ला प्रशासनाचे अभयदान का ?

चंद्रपूर /गोंडपिपरी :-

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती व गौण खनीज उत्खनन सुरु असून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविल्या जात आहे, विशेष म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी ते जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमातून माफियाना सूट देऊन शासनाच्या महसूलाची चोरी केल्या जात आहे, कारण स्थानिक महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या मर्जी शिवाय कुठलाही अवैध धंदा होतं नाही, त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीची चोरी करण्यात महसूल प्रशासनाचे अधिकारी व पोलीस प्रशासन जबाबदार असते हे त्रिवार सत्य आहे. असाच प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा रेती घाटात सुरु असून राजुरा येथील ताज ट्रेडर्स चे अमजद खान यांची टोळी रात्रीच्या वेळी पोकलेन व जेसीबी मशीन च्या माध्यमातून रेती घाटातून रेती उत्खनन करून ती घाटावर आणली जाते व दिवसा टीपी दाखवून ती हायवा ट्रकमध्ये याच मशीनने भरून वहण केल्या जाते यामाधे कोट्यावधी रुपयाचा शासनाचा महसूल बुडविल्या जात असताना स्थानिक प्रशासन मात्र याकडे आर्थिक नजरेतून डोळेझाक करत आहे. दरम्यान अमजद खान यांचा रेती घाटावरचा फोटो व त्यामागील पोकलेनं मशीन ने हायवा ट्रक भरतानाचे चित्र व काही दिवसापूर्वी याच विठ्ठलवाडा च्या रेती घाटाचा व्हायरल झालेला व्हिडीओ अमजद ला प्रशासनाचे किती पाठबळ आहे हे स्पष्ट होतं आहे.

अप्पर जिल्हाधिकारी यांनी ऐन रेती घाट लिलाव करण्याची वेळ जवळ आली असताना व 10 ऑक्टोबर पर्यंत जी रेती घाटावरून उचल केली नाही ती सरकार जमा करण्याचे आदेश दिले असतांना त्यानी आता अचानक 31 डिसेंबर पर्यंत रेती घाटावर असलेली रेती उचलण्याची संमती देऊन एक प्रकारे रेती घाटातून रेती चोरी करण्याची रेती घाट धारकांना सुवर्ण संधी दिली आहे व शासनाचा कोट्यावधी रुपायचा महसूल बुडवीला जात आहे, या संदर्भात मुंबई उच्चं न्यायालयात नागपूर खंडपीठात जनहित याचिका टाकली जाणार आहे, दरम्यान जिल्हा खनिकर्म अधिकारी व स्थानिक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या सरक्षणामध्ये ज्या पद्धतीने अमजद खान विठ्ठलवाडा रेती घाटात पोकलेन व जेसीबी मशीन टाकूनं रात्रीच्या अंधारात रेती उत्खनन करत आहे व शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविल्या जात आहे ते राष्ट्र विरोधी पाप महसूल अधिकारी करत असताना जिल्हाधिकारी यावर अंकुश लावण्यात का असमर्थ आहे हेच कळायला मार्ग नाही.

अमजद खान यांची पोकलेन मशीन का सोडली?

मागील 10 डिसेंबर ला गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी व पोलिसांनी विठ्ठलवादा रेती घाटावर धाड टाकली होती व पोकलेन मशीन जप्त केली होती, परंतु त्यांनंतर ती मशीन रेती घाटावर असल्याची प्रसारामध्यमाना माहिती देऊन ती मशीन सोडण्यात आली याचा अर्थ महसूल अधिकारी या रेती चोरीत सहभागी आहे व आता अप्पर जिल्हाधिकारी यांच्या रेती घाटावर असलेला रेती साठा उचल करण्याची जी मंजुरी मिळाली त्याचा फायदा घेऊन अमजद खान यांना रेती घाटात मशीन द्वारे रेती उत्खनन करण्याची संधी देण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. या अगोदर याच बिठ्ठलवाडा रेती घाटातून चार चार मशीन द्वारा रेती उत्खनन कारण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता व आता सुद्धा तसा व्हिडीओ व्हायरल झाला असतांना तेथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कुठल्या जगात वावरत आहे हे कळायला मार्ग नाही, मात्र सरकारी संपतीची लूट ज्या पद्धतीने चाललेली आहे ते पाहता महसूल अधिकारी हेच रेती चोरी करायला लावत असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. दरम्यान हा प्रकार विभावीय आयुक्त यांच्याकड़े जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here