Home चंद्रपूर क्राईम ब्लास्ट :- गोंडपिपरी तालुक्यातील वादग्रस्त ‘कुलथा’ घाटावर गुंड रेती तस्करांचा जीवघेना...

क्राईम ब्लास्ट :- गोंडपिपरी तालुक्यातील वादग्रस्त ‘कुलथा’ घाटावर गुंड रेती तस्करांचा जीवघेना हल्ला.

या हल्ल्यात तारडाचे सरपंच तरुण गंगाराम उमरे, तमुस अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक माहिती.

गोंडपिपरी :-

जिल्ह्यात रेती घाट धाराकांना अप्पर जिल्हाधिकारी यांनी 31 डिसेंबर पर्यंत रेती उचलण्याची खुली सूट दिल्यानंतर आता रेती तस्कर रेती घाटातून पोकलेनं मशीन ने रेती उत्खनन करून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवीत असताना आता त्यावर शिक्कामोर्तब झाले असून गोंडपिपरी तालुक्यातील वादग्रस्त ‘कुलथा’ घाटावर गुंड प्रवृत्तीच्या रेतितस्करांचा दि. (२८) बुधवारी रात्री १ वाजता दरम्यान गावकऱ्यांनी जेसीबी व पोकलेन नदिघाटात टाकायला अडवल्याननंतर तस्करांनी गावकऱ्यांवरचं चाकू व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला केल्याचा व या हल्ल्यात तारडाचे सरपंच तरुण गंगाराम उमरे, तमुस अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने स्थानिक महसूल प्रशासनाला रेती उत्खनन करणाऱ्या रेती घाट धाराकांना अडवू नये अशा मौखिक सूचना दिल्याचे विश्वासनीय सूत्राकडून कळाले आहे त्यामुळे अवैध रेती चोरीला आळा बसाविण्यासाठी गावाकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत असल्याची गंभीर बाब उगत झाली आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटासह विठ्ठलवाडा घाटावरून रात्रीच्या सुमारास जेसीपी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने ट्रॅक्टरने स्टॉक तयार करत रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचा प्रकार सुरू आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने रेती घाटावर उरलेला स्टॉक उचलण्याची (३१) डिसेंबर पर्यंत परवानगी दिली होती. मात्र अनेक घाटावर स्टॉक शिल्लकचं नसल्याने मिळालेल्या परवानगीच्या आधारावर संधीचा फायदा घेत नदीपत्रातून रेती उपसा करने सुरू आहे. मोठ्या प्रमाणात रेती तस्करांकडून दादागिरी करत रेती उपसा सुरू आहे. नदीपात्रात जेसीबी, हायवा, पोकलेनचा वापर करू नये यासाठी सरपंच, तमुस अध्यक्ष यांच्यासह काही महिलांनी रेती घाटावर धडक दिली. शाब्दिक वादानंतर मारहाणीत रूपांतर झाले. दरम्यान रेती तस्करांनी लोखंडी रॉड व धार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. हलेखोरांची ओळख पटली असून हल्लेखोरांनी घटस्थळवरून पळ काढला.

जखमींच्या बयानानुसार रेती माफिया यांच्यावर ३०७ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अद्याप हलेखोर पोलिसांच्या हाती सापडले नाही. अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असून पुढील तपास ठाणेदार जीतन गनगऊ पीएसयाग घोगरे यांच्या मार्गटर्शनात मऊ याटे गंभीर आहे.

अप्पर जिल्हाधिकारी जबाबदारी घेणार का?

जिल्ह्यातील रेती घाटातून रेती उचल करण्याची मुद्दत 10 ऑक्टोबर ला संपल्यांनतर शिल्लक रेती साठा हा शासनाचा होईल असा जिल्हाधिकारी यांचा आदेश दिला होता व तो रेती साठा किती आहे त्याचे मोजमाप करण्याचे आदेश स्थानिक उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना आदेश दिले होते पण रेती घाट धाराकांना खुली सूट देत तेंव्हा रेती साठा किती होता याचे मोजमाप नं करता रेती घाट धाराकांनी दिलेल्या बोगस व अंदाजे रेती साठा बाबत माहितीनुसार त्याना रेती उचल करण्याची अप्पर जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आणि आता त्याचा फायदा घेत रेती घाट धारक नदीतील घाटातून रेती उपसा करत असल्याने व यावर स्थानिक महसूल प्रशासन गप्प असल्याने गावाकऱ्यांना याबाबत पुढाकार घेऊन नदीतील रेती मशीन द्वारे उपसा होऊ नये म्हणून रात्रीच्या वेंळी जीव धोक्यात घालून रेती माफियाची अडवणूक करावी लागत आहे. व रेती माफिया कडून त्यांच्यावर जीवेघेना हल्ला केल्या जात आहे याची नैतिक जबाबदारी अप्पर जिल्हाधिकारी घेणार का? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here