Home क्राईम स्टोरी सनसनीखेज :- उद्धव ठाकरे गटाच्या वाहतूक सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील काशीकर वर...

सनसनीखेज :- उद्धव ठाकरे गटाच्या वाहतूक सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील काशीकर वर गुन्हे दाखल.

गोंडपीपरी पोलिसांची कारवाई, साहिल सय्यद, वैभव पेंडसे यांना अटक तर स्वप्नील काशीकर व इतर आरोपी फरार.

रेती साठा उचल करण्याची बेकायदेशीर परवानगी देणारे अप्पर जिल्हाधिकारी व खनिकर्म अधिकारी गोत्यात

गोंडपिपरी प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात अनेक राजकीय पक्षात गुंडागिरी करणाऱ्यांची व अवैध धंदे करणाऱ्यांची मोठी फौज असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील काशीकर ज्यांच्यावर  उपविभागीय वन अधिकारी यांची बंदूक हिसाकावून त्यांच्यावरचं वार करण्याचा प्रयत्न व त्यांना धमाकावून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी स्वप्नीलवर गुन्हे दाखल आहे, स्वप्नील यांनी आपल्या सहकारी यांना घेऊन कुलथा रेती घाटावरचे अवैध रेती उत्खनन बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तारडाचे सरपंच तरुण गंगाराम उमरे, तमुस अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे यांच्यावंर जीवघेना हल्ला केल्या प्रकरणी गोंडपिपरी पोलिसांनी कलम 307 व इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले असून साहिल सय्यद, वैभव पेंडसे यांना अटक केली आहे. दरम्यान स्वप्नील काशीकर व इतर पाच ते सहा आरोपी फरार असून त्यांचा शोध गोंडपिपरी पोलीस घेत आहे. या हल्ल्यात जखमी पैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर वळणावर आल्याने रेती माफियाचे धाबे दणाणले आहे.

चायनीज सेंटर ते कोट्याधीश स्वप्नील ची कहाणी,

भाजप पक्षात जुळलेला स्वप्नील काशीकर यांची घरची परिस्थिती फार बेताची होती पण नंतर त्यांनी एका राजकीय टोळीशी पंगा घेतला व नंतर त्या टोळीच्या मोरक्या सोबत हात मिळवनी केली आणि वन विभाग टार्गेट करून आपल्या सहकार्यांना घेऊन दादागिरी सुरु केली. दरम्यान रेती चोरीचा प्रकरणात माझा ट्रक का अडवला म्हणून एका वन विभागाच्या अधिकाऱ्याला त्याचीच बंदूक हिसाकावून त्यांनी जीवघेना हल्ला केला होता व त्या प्रकरणी त्यांच्यासह सहकार्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना कारागृहाची कोठडी मिळाली होती. नंतर त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून आपला अवैध रेतीचा व्यवसाय थाटला आणि कोट्यावधी रुपयाचा धनी झाला. चायनीज सेंटर ते कोट्याधीश होण्याची स्वप्नीलची कहाणी अतिशय रोचक असून असून पैशाचा गुर्मी त्यांच्या डोक्यात घुसल्याने त्यांचीदादागिरी वाढली व आता अशी वाताहत झाली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी येणार गोत्यात?

जिल्ह्यातील रेती घाटातून रेती उचल करण्याची मुद्दत 10 ऑक्टोबर ला संपल्यांनतर शिल्लक रेती साठा हा शासनाचा होईल असा जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला होता व तो रेती साठा किती आहे त्याचे मोजमाप करण्याचे आदेश स्थानिक उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना आदेश दिले होते पण रेती घाट धाराकांना खुली सूट देत तेंव्हा रेती साठा किती होता याचे मोजमाप नं करता रेती घाट धाराकांनी दिलेल्या बोगस व अंदाजे रेती साठा बाबत माहितीनुसार त्याना रेती उचल करण्याची अप्पर जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आणि आता त्याचा फायदा घेत रेती घाट धारक नदीतील घाटातून रेती उपसा करत असल्याने व यावर स्थानिक महसूल प्रशासन गप्प असल्याने गावाकऱ्यांना याबाबत पुढाकार घेऊन नदीतील रेती मशीन द्वारे उपसा होऊ नये म्हणून रात्रीच्या वेंळी जीव धोक्यात घालून रेती माफियाची अडवणूक करावी लागत आहे व दरम्यान रेती माफिया कडून त्यांच्यावर जीवेघेना हल्ला केल्या जात आहे याची जबाबदारी अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांची असून रेती उत्खनन व चोरीला हेच अधिकारी चालना देत असल्याने व त्यांच्या  विरोधात मंत्रालयातून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागल्याने ते गोत्यात आले आहे.

आता या प्रकरणात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिकारी काय निर्णय घेतात व मुख्य आरोपी व त्यांना साथ देणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here