Home गडचिरोली खेळाच्या आयोजना सोबतच सामाजिक कार्यातही पुढाकार घ्या ; महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे युवकांना...

खेळाच्या आयोजना सोबतच सामाजिक कार्यातही पुढाकार घ्या ; महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे युवकांना आवाहन कबड्डी स्पर्धेत रांगी संघ अव्वल

खेळाच्या आयोजना सोबतच सामाजिक कार्यातही पुढाकार घ्या ; महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे युवकांना आवाहन

कबड्डी स्पर्धेत रांगी संघ अव्वल

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर
गडचिरोली जिल्हा : तरुणाचा रक्त हा सळसळता आहे, युवकांनी ठरविल्यास अश्यक्य असे काहीच नाही, वर्तमानातील युवक क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात पुढाकार घेतात, हे स्वागताहार्य आहे. मात्र याही पुढे जाऊन युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान, आरोग्य तपासणी शिबीर, अभ्यासिका निर्मिती सारख्या इतरही सामाजिक कार्याकरीता पुढाकार घ्यावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित युवकांना केले.
आरमोरी तालुक्यातील चामोर्शी (माल ) येते भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या समरोपीय सोहळ्या निमित्त ते बोलत होते. यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा आस्वाद घेतला.
चामोर्शी विरुद्ध रांगी संघात झालेल्या अत्यंत चूरशीच्या सामन्यात रांगी संघ विजेता ठरला. विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते सन्माचिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते नीलकंट गोहने, राजू घोडाम, अनुप कोहळे सह मोठ्या संख्येने कबड्डी प्रेमी दर्शक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here