Home चंद्रपूर चौगान येथे विजयभाऊ जनसेवा केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न विजयभाऊ जनसेवा केंद्राच्या माध्यमातून...

चौगान येथे विजयभाऊ जनसेवा केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न विजयभाऊ जनसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची कामे होणार जलद

चौगान येथे विजयभाऊ जनसेवा केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न

विजयभाऊ जनसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची कामे होणार जलद

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-ब्रम्हपुरी तालुका गावपातळीवरील सर्वसामान्य माणसांना शासकीय कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. यावेळी अनेक अडथळ्यांचा सामना सुध्दा त्यांना करावा लागतो. काही नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती नसल्याने ते शासकीय योजनांच्या लाभापासून देखील वंचित राहतात. ही बाब जाणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांची कामे जलदगतीने पुर्ण झाली पाहिजे. सोबतच त्यांना शासकीय योजनांचा लाभ सहजतेने मिळाला पाहिजे या उदात्त हेतूने राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतुन ब्रम्हपूरी तालुक्यातील प्रत्येक गावात विजयभाऊ जनसेवा केंद्र उभारून त्याठिकाणी विजयदुतांची नियुक्ती केली आहे. हे विजयदूत नागरिकांना शासकीय व इतर कामांसाठी मदत करणार आहेत. विजयभाऊ जनसेवा केंद्रापर्यंत जे वृद्ध, अपंग व आजारी व्यक्ती पोहचू शकत नाही अशा व्यक्तींच्या घरी स्वतः जाऊन विजयदुत सेवा देणार आहेत.

ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान येथे उभारण्यात आलेल्या विजयभाऊ जनसेवा केंद्राचा उद्घाटन समारंभ आज दि. 5 जानेवारी रोजी संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य देविदास जगनाडे यांच्या हस्ते पार पडले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिताताई पारधी, राजीव गांधी पंचायतराज संघटनचे प्रदेश महासचिव थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, विजयभाऊ जनसेवा केंद्राचे तालुका समन्वयक प्रा. डि.के.मेश्राम, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, नगरपरिषदेच्या महीला व बालकल्याण सभापती सुनिताताई तिडके, बाजार समितीचे संचालक दिवाकर मातेरे, अनुसूचित जमाती सेलचे तालुकाध्यक्ष छत्रपती सुरपाम, माजी पोलीस पाटील किशोर तिडके, अनिल पिलारे, ग्रा.पं. सदस्या ज्योती चहांदे, ग्रा.पं.सदस्या वर्षा गुणशेटवार , सेवा सहकारी संस्था सदस्य सुलभा बुराडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल मैंद यांनी तर प्रास्ताविक खेमराज तिडके यांनी केले. आभार श्रीहरी देवगडे यांनी मानले.
कार्यक्रमाला विविध बुथवरील विजयदुत व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here