Home गडचिरोली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे विविध सेल च्या अध्यक्षांची आढावा बैठक संपन्न

तालुका काँग्रेस कमिटी तर्फे विविध सेल च्या अध्यक्षांची आढावा बैठक संपन्न

तालुका काँग्रेस कमिटी तर्फे विविध सेल च्या अध्यक्षांची आढावा बैठक संपन्न

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर
देसाईगंज:- देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटी च्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक स्थानिक विश्राम गृहात घेण्यात आली.
त्या आढावा बैठकीत विविध सेल पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा मागविण्यात आला. येणाऱ्या दिवसात तालुक्यात प्रत्येक गावात काँग्रेस कमिटी सेलच्या बूथ कमिट्या स्थापन करून काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी असणाऱ्या लोकांना पक्षात घ्या, त्यांना डावलण्याचा प्रयत्न न करता सर्वांनी पक्षासाठी एकजुटीचे कार्य करून पक्षाची ध्येय धोरणे सामान्य माणसापर्यंत पोहचविन्याच्या सूचना देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले यांनी उपस्थित काँग्रेस पक्षाच्या विविध सेल च्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. लवकर तालुक्यातील प्रत्येक गावात युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, अल्पसंख्याक, सोशल मीडिया व इतर सेल च्या बूथ कमिटी स्थापन होणार आहेत.
या आढावा बैठकीत जिल्हा युवक काँग्रेस चे प्रवक्ते तथा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज चहांदे, महिला काँग्रेस कमिटी चे तालुकाध्यक्षा पुष्पा कोहपरे, ओबीसी तालुकाध्यक्ष कैलाश वानखेडे, सेवादल शहरध्यक्ष भिमराव नगराळे, युवक शहर उपाध्यक्ष विजय पिल्लेवान, महिला शहर अध्यक्ष सैनाज पठाण, ओबीसी शहर प्रमुख यामीना कोसरे, सोशल मीडिया अध्यक्ष मोहित अत्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here