Home चंद्रपूर पत्रकार विश्वास मोहिते यांचा विशेष कार्याबद्दल कराडमध्ये सन्मान

पत्रकार विश्वास मोहिते यांचा विशेष कार्याबद्दल कराडमध्ये सन्मान

पत्रकार विश्वास मोहिते यांचा विशेष कार्याबद्दल कराडमध्ये सन्मान

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

पाडळी (केसे) तालुका कराड गावचे सुपुत्र, आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि तिरंगा रक्षक चे संपादक विश्वास मोहिते यांचा घर तिथे संविधान या उपक्रमाबद्दल अखिल मराठी पत्रकार संघाच्या वतीने कराड येथे सत्कार करण्यात आला.

अखिल मराठी पत्रकार संघाच्या वतीने कराड येथील अलंकार हॉटेलमध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत असलेल्या लोकांचा विशेष कार्याबद्दल सन्मान आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार गोरख तावरे, पत्रकार नितीन ढापरे, कैलास थोरवडे, दिनकर थोरात यांच्यासह विविध विशेष कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पाडळी केसे तालुका कराड गावचे सुपुत्र आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांनी नुकताच प्रतिष्ठांच्या माध्यमातून घर तिथं संविधान हा उपक्रम राबवला आहे त्याचा शुभारंभ कराड येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून केला होता त्यामुळे या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कराड येथील जेष्ठ पत्रकार प्राध्यापक अशोक चव्हाण होते. कार्यक्रमास प्रमुखातिथी म्हणून शेतीमित्र अशोकराव थोरात, कराड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, कराड तालुका मनसेचे अध्यक्ष दादासाहेब शिंगण होते.
कार्यक्रमाचे नियोजन पत्रकार विजय पाटील, अजिंक्य गोवेकर, अतुल होनकळसे, वसीम सय्यद, हारून मुलाणी,कैलास थोरवडे, नितीन डापरे, यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार गोरख तावरे, शशिकांत पाटील, प्रमोद सुकरे,देवदास मुळे,सचिन शिंदे, हेमंत पवार, आनंदराव पाटील,संभाजी थोरात, सुनील पवार, वसंतराव शिंदे, दिलीप महाजन सहभाव संख्येने पत्रकार उपस्थित होते. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन हारून मुलाणी यांनी केले तर आभार अजिंक्य गोवेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here