Home Breaking News गावंडे गुरुजींच्या निधनाने हाडाचा शिक्षक व सहृदय राजकीय नेता गमावला : सुधीर...

गावंडे गुरुजींच्या निधनाने हाडाचा शिक्षक व सहृदय राजकीय नेता गमावला : सुधीर मुनगंटीवार

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  काँग्रेसचे नेते , लोकमान्य टिळक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री गजाननराव गावंडे गुरुजी यांच्या निधनाने हाडाचा शिक्षक व सहृदय राजकीय नेता आपण गमावल्याची शोकभावना चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

शिक्षक म्हणून विद्यादानाचे कार्य त्यांनी अतिशय निष्ठेने केले. माझ्या विरोधात त्यांनी विधानसभा निवडणुक लढवली होती. त्या दरम्यान होणाऱ्या भेटीतही निकोप राजकारणाची भावना त्यांनी कायम जोपासली.

पक्षीय मतभेदाच्या भिंती बाजूला सारून गावंडे गुरुजींनी शिक्षक विद्यार्थी हे नाते कायम जपले. शांत सुस्वभावी असलेले गावंडे गुरुजींच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. या दुःखातुन सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here