Home महाराष्ट्र अभिनंदनीय :-महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या नाशिक शहर अध्यक्ष पदी मयूर कुकडे,

अभिनंदनीय :-महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या नाशिक शहर अध्यक्ष पदी मयूर कुकडे,

मनसे शाखा अध्यक्ष ते शहर अध्यक्ष असा चढता आलेख निर्माण करणारे मयूर कुकडे यांचे सर्वत्र होतं आहे अभिनंदन.

नाशिक वृत्तसेवा :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक शहराचा एक शाखा अध्यक्ष व वाहतूक सेना शहर उपाध्यक्ष असा राजकीय प्रवास करत असताना ज्यांनी पक्ष स्थापनेपासून आपली कट्टर महाराष्ट्र सैनिक म्ह्णून भूमिका बजावली व पक्षाचे संघटन वाढविण्यात आपले अमूल्य योगदान देण्याचा प्रयत्न केला असे मयूर कुकडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, सरचिटणीस आरिफ भाई शेख व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विश्वास भाऊ तांबे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या नाशिक शहर अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. मयूर कुकडे यांच्या नियुक्तीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होतं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा जो विचार युवा पिढीला देऊन सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक दृष्टीने विकास साधण्यासाठी महाराष्ट्राचा विकास आराखडा निर्माण केला, दरम्यान नाशिक महानगरपालिकेत सत्ता असताना त्यांनी विकासाचे जे काम केले व शहराला सर्वांगसुंदर बनवले त्या विचारांनी प्रेरीत होऊन लाखों युवक आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जुळत आहे व पक्षाशी प्रामाणिक पणे जुळलेले कार्यकर्ते पक्ष संघटन मजबूत करत आहे, त्यात मयूर कुकडे हे चांगली कामगिरी करत असल्याने त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर उपाध्यक्ष ते आता शहर अध्यक्ष अशी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या हातून राजसाहेबांना अपेक्षित असे नवनिर्माणाचे काम घडो व नाशिक महानगरपालिकेत पुन्हा मनसेची सत्ता येवो हीच सर्व महाराष्ट्र सैनिकांकडून मयूर कुकडे यांच्या नियुक्ती निमित्य सदिच्छा.

Previous articleक्रीडा संकुलाच्या निर्मिती करीता, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भीक मांगो आंदोलन नमो चषक च्या नावाने लोकप्रतिनिधी कडून लाखो रुपयाची उधळन, मात्र क्रीडा संकुलाच्या निर्मितीस निधी देण्याकडे शासनाचे दुर्लक्ष– महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा आरोप
Next articleगावंडे गुरुजींच्या निधनाने हाडाचा शिक्षक व सहृदय राजकीय नेता गमावला : सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here