चंद्रपूर जिल्ह्यासह कांग्रेस चे इतर 20 आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार?
चंद्रपूर :-
नुकतेच काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने राजकीय चर्चेला उधान आले असताना भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आणखी नव्या भूकंपाचे संकेत दिले आहेत. फक्त 15 दिवस थांबा राज्यात आणखी प्रचंड मोठे भूकंप होणार आहेत. तुम्हाला वाटणारही नाही, असे नेते भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने ईडीच्या रडारवर असणाऱ्या संभावित कांग्रेस आमदारांचा भाजप प्रवेश प्रवेश निश्चित मानला जात आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील एका आमदाराचे भाजप मध्ये जाणे निश्चित मानले जात असल्याने चंद्रपूर च्या राजकीय क्षेत्रात राजकीय भूकंपाचे हादरे बसणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष बदला, अशी मागणी केल्याची माहिती नुकतीच समोर आलीय. विशेष म्हणजे आशिष देशमुख यांनी दिल्लीत जावून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत आपली उद्विग्नता व्यक्त केली होती, दरम्यान महाराष्ट्रात 15 महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं तेव्हा काँग्रेसचे तब्बल 20 आमदार बंडखोरी करणार असल्याची चर्चा होती. त्या बंडाखोर आमदारामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता व ते त्यांच्या समर्थकासह भाजप मध्ये जाणार अशी चर्चा होती, परंतु ती वेळ टळली पण आता तो राजकीय भूकंप घडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे,
भाजप ची एक खिडकी भ्रष्टाचारी योजना.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा भाजप ने विरोधी पक्षातील आमदार खासदार फोडाफोडीत एवढा चिखल करून ठेवलाय की आता नीतिमत्ता व स्वाभिमान या गोष्टी इतिहासजमा झाल्या आहे. भ्रस्टाचार करा आणि भाजप मध्ये येऊन स्वतःला क्लीनचिट मिळवा अशी भाजप ची एक खिडकी भ्रष्टाचारी योजना जणू सुरु झाली आहे, ज्या अजित पवारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेल मध्ये पाठवण्याची भाषा करत होते त्या अजित पवारांना राज्याचे अर्थमंत्री करून तिजोरीची चाबी दिली व पुन्हा भ्रष्टाचार करण्याची संधी देत आहे आणि छल कपट करून व सर्व न्यायालयीन यंत्रणा विकत घेऊन ते लोकशाहीची हत्त्या करत आहे, यावर पुरोगामी महाराष्ट्रातील सामाजिक नेते, पत्रकार व साहित्यिक मौन बाळवून आहे हे खरे तर लोकशाहीच दुर्भाग्यच म्हणावे लागेल. ज्या महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील नेत्यांनी साहित्यिकांनी इतर राज्याला प्रबोधन केले त्या राज्याची अशी दयनीय अवस्था व्हावी व त्या राज्यातील नेत्यांना राजकीय प्रबोधन दुसऱ्या राज्यातील नेत्यांकडून करण्याची वेळ यावी म्हणजे आपले किती राजकीय पतन झालं याची कल्पना येते. भाजपने इतर पक्षाच्या नेते व लोकप्रतिनिधीच्या अमाप संपत्तीला लक्ष करून त्यांना भाजप मध्ये आणण्यासाठी ईडी लावायची योजना “लोटस कमळ” म्हणून राबवली ती सामाजिक आरोग्याला घातक ठरत आहे. दरम्यान येणाऱ्या निवडणुकीत भ्रष्टाचारी नेत्यांना उमेदवारी मिळणार असल्याने व भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्ते, नेत्यांना घरी बसण्याची वेळ येत असल्याने ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करून भ्रष्टाचारी उमेदवाराला धडा शिकवेल का? की लाचार बनून राहणार हे येणाऱ्या काळात दिसणारच आहे.