Home Breaking News जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा सप्ताह चे जनता महाविद्यालय येथे उदघाटन

जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा सप्ताह चे जनता महाविद्यालय येथे उदघाटन

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

स्वामी विवेकानंद यांच्यासारखे तेजोमय तुम्ही व्हावे – उदघाटक मा. जितेंद्र गादेवार

चंद्रपूर  :-  संपूर्ण देशात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा सप्ताह साजरा केला जात आहे.नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) आणि जनता महाविद्यालय, चंद्रपूर अंतर्गत चांदा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ.अशोकभाऊ जिवतोडे आणि जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष आणि जिल्हा युवा अधिकारी शमशेर सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली जनता महाविद्यालय, चंद्रपूर (राष्ट्रीय सेवा योजना विभाग), स्व. सुशीलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालय, पडोली, चंद्रपूर, चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर याच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा सप्ताह उत्सव चे आयोजन 12 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आले आहे.

12 जानेवारी रोजी जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे उदघाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी My Bharat विकसित भारत @2047 या विषयावर वक्तृत्व स्पर्धा पार पडली. स्पर्धेत जिल्ह्यातील युवा व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये स्वामी विवेकानंद याचे विचार रुजावे आणि खेड्यापाड्यातील युवक पुढे येऊन राष्ट्राचा आधार व्हावा हा उद्देश्य आहे. कार्यक्रमास उदघाटक म्हणून जितेंद्र गादेवार नायब तहसीलदार, चंद्रपूर, यांनी उपस्थित युवकांना संबोधित करताना सांगितले की स्वामी विवेकानंद यांच्यासारखे तेज तुमच्यात झळकावे व तुम्ही उद्याचे राष्ट्र निर्माते व्हावे.

कार्यक्रम अध्यक्ष डॉ. आशिष महातळे, उपप्राचार्य जनता महाविद्यालय, चंद्रपूर विशेष अतिथी प्रा. नरेंद्र टिपले, उपप्राचार्य, सुशिलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालय ॲड. देवा पाचभाई, विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद, महाराष्ट्र राज्य, सहाय्यक प्रा.डॉ. किरण कुमार मनुरे, SRM कॉलेज ऑफ़ सोशल वर्क, पडोली, सहाय्यक प्रा. अमर बल्की, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, जनता महाविद्यालय, चंद्रपूर सहाय्यक प्रा. गणेश येरगुडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रामुख्याने कार्यक्रमात उपस्थित होते.

श्री. निकीलेश चामरे, चंद्रपूर जिल्हा युथ लिडर नेहरू युवा केन्द्र, चंद्रपूर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक श्री. अविनाश पोईनकर, प्रा. अनिल डहाके आणि डॉ.आय.एस. काँड्रा यांनी परीक्षण केले. कार्यक्रमाचे संचालन कु. भाग्यश्री निमकरडे आणि क्रांतीवीर सिडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक श्रीरामे, अमित घोष, समीर नंदुरकर, बादल चिवंडे, शंकर बोंडे आणि विक्रांत जिनका यांनी सहकार्य केले. सर्वांचे आभार विशिता सुर्यवंशी हिने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here