Home चंद्रपूर विजयदुतांनी सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे सेवक बनून कार्य करावे- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...

विजयदुतांनी सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे सेवक बनून कार्य करावे- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सावली येथे विजयदूत स्वयंसेवक यांची कार्यशाळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर संपन्न

विजयदुतांनी सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे सेवक बनून कार्य करावे- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

सावली येथे विजयदूत स्वयंसेवक यांची कार्यशाळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर संपन्न

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- राज्याचे विरोधी पक्षनेते, तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे शासकीय किंवा अशासकीय कामे सोयीचे व्हावे याकरिता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात जनसेवा केंद्राची स्थापना होणार आहे. यासाठी विजयदूत स्वयंसेवक यांची नेमणूक करून यांच्या माध्यमातून ही जनसेवेची कामे पार पडणार आहेत. विजय दुतांनी सर्व सामान्य गोरगरीब जनतेचे सेवक बनून कार्य करावे असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले ते सावली येथील काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित विजयदूत स्वयंसेवक यांची कार्यशाळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तर प्रमुख उपस्थिती म्हणून गडचिरोली येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.संदीप पाटील गड्डमवार,माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणूरवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,महिला तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर,माजी पंचायत समिती सभापती सावली मा.विजय कोरेवार,माजी सभापती पंचायत समिती सावली मा.राकेश पाटील गड्डमवार,सावली शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगर पंचायत सावलीच्या नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चूदरी,सावली तालुका युवक काँग्रेसअध्यक्ष मा.किशोर कारडे,युवक शहर अध्यक्ष मा.अमर कोणपत्तिवार,सावली शहर महिला अध्यक्षा सौ.भारती चौधरी तसेच गाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,पदाधिकारी,महिला आघाडी,युवा आघाडी नवनियुक्त विजयदूत,कार्यकर्तागणं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावपातळीवरील सर्वसामान्य माणसांना शासकीय कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात, नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती नसल्याने ते शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहतात, ही बाब जाणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांची कामे जलदगतीने पुर्ण झाली पाहिजे. सोबतच त्यांना शासकीय योजनांचा लाभ सहजतेने मिळाला पाहिजे या उदात्त हेतूने राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतुन सावली तालुक्यातील विधानसभेच्या ३ बूथामागे एक विजयदूत ठेवण्यात आला असून विजयभाऊ जनसेवा केंद्र उभारून त्याठिकाणी विजयदुतांची नियुक्ती केली आहे. हे विजयदूत नागरिकांना शासकीय व इतर कामांसाठी मदत करणार आहेत. विजयभाऊ जनसेवा केंद्रापर्यंत जे वृद्ध, अपंग व आजारी व्यक्ती पोहचू शकत नाही अशा व्यक्तींच्या घरी स्वतः जाऊन विजयदुत सेवा देणार आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.विजय कोरेवार यांनी, प्रास्ताविक सावली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहने, तर आभार प्रदर्शन जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here