Home चंद्रपूर मौजा बारसागड येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत

मौजा बारसागड येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत

मौजा बारसागड येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-सावली तालुक्यातील मौजा.बारसागड येथे राज्याचे विरोधी पक्षनेते,सावली-ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष मा.राजूभाऊ सिद्धम,सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,माजी उपसभापती प.स.सावली मा.राजेंद्र पाटील भोयर यांच्या हस्ते कॅन्सरने मृत पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली.*

*सविस्तर वृत्त असे की मौजा.बारसागड येथील कॅन्सरग्रत रुग्ण स्व.अंगद चौधरी व स्व. शेवंता धारणे यांची बऱ्याच दिवसापासून तबेत बरी नसल्यामुळे ते उपचार घेत होते,दोन्ही कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या घरातील आर्थिक परिस्थिती दैनीय असल्यामुळे उपचारा दरम्यान दोन्ही रुग्णांना आपला जीव गमवावा लागला,याची माहिती मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर यांनी दिली.दुःख व्यक्त करत मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी तात्काळ संबंधित रुग्णांच्या आर्थिक मदत दिली.*

*आर्थिक मदत देताना माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष मा.राजूभाऊ सिद्धम,सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,माजी उपसभापती प.स.सावली मा.राजेंद्र पाटील भोयर,बारसागडचे उपसरपंच व गाव काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.युवराज चौधरी,गाव काँग्रेस कमिटी अध्यक्षा सौ.माधुरी चौधरी,काँग्रेस कार्यकर्त्या यमुनाताई चौधरी,मा.कवींद्र निसार,ललिताताई चौधरी,मा.गोविंदा चौधरी आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here