Home Breaking News चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ चंद्रपूर च्या वतीने उपवर युवक -युवती...

चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ चंद्रपूर च्या वतीने उपवर युवक -युवती परिचय मेळावा संपन्न ८ जोडपी सामूहिक विवाहबद्ध

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर   :-  जिल्हा भोई समाज सेवा संघ चंद्रपूर च्या वतीने 07 जानेवारी 2024, ला चंद्रपूर येथील जतीराम बर्वे सभागृह, एकलव्य मुलाचे वस्तीगृह रेंजर कॉलेज समोर मुल रोड चंद्रपूर येथे भोई समाजातील उपवर युवक – युवती विवाह इच्छुक विदुर विधवा घटस्फोटीता आणि अपंग यांचा विदर्भस्तरीय परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. तरी या परिचय मेळाव्यात जवळपास 200 ते 210 उपवरानी परिचय दिला यांनी मेळाव्याचा लाभ घेतला, विवाह जोडलेल्यांसाठी विवाहाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली होती,

संजय कोतपल्लीवार व बंधूंनी नव विवाहित वधू वरांना पोशाख, जोडे, चपला, बाशिंग आदीनची पूर्तता केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कृष्णाजी नागपुरे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ चंद्रपूर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय नामदार किशोर भाऊ जोरगेवार आमदार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय माजी न्यायमूर्ती चंद्रलालजी मेश्राम हे उपस्थित होते तसेच माननीय प्रकाशराव डायरे श्री मनोहरराव पचारे श्री. सुरेश भाऊ पचारे माजी नगरसेवक श्री.बंडूभाऊ हजारे माजी नगरसेवक उपस्थित होते.

याप्रसंगी दीप प्रज्वलन करून व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली माननीय आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणामध्ये भोई समाज सेवेकरी समाज असल्याचे प्रामुख्याने नमूद केले तसेच भोई समाजाला लागेल तेवढी आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले तसेच भोई समाजाच्या विकासाकरिता सदैव प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी जलाशयात बुडणाऱ्यांचे प्राण वाचवणारे साहसी कार्य करणारे शुर बांधव नवनिर्वाचित नगरसेवक सरपंच उपसरपंच विशेष पुरस्कार मिळवणारे तथा पीएचडी प्राप्त करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला.भोई समाज महिला शाखेतर्फे याप्रसंगी राणी लक्ष्मीबाई यांच्या महिला सेनापती झलकारी बाई यांच्या जीवनावर आधारित प्रभावी नाटिका सादर करण्यात आली.

उपवर युवक – युवती परिचय मेळाव्याकरिता श्री. बंडूभाऊ हजारे माजी नगरसेवक यांच्याकडून 2000 रुपये समाज बांधवांकरिता भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. हे विशेष.याप्रसंगी सर्व विविध मान्यवरांनी समाज प्रबोधन केले समाजामध्ये आत्मनिर्भर व स्वयंरोजगार निर्माण करून प्रगती साधण्याचे आवाहन करण्यात आले, माननीय श्री कृष्णाजी नागपुरे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा भोई समाजसेवा संघ यांच्या नेतृत्वात समाज आर्थिक , शैक्षिणक, सामाजिक प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. विकासाकडे वाटचाल करीत आहे. असे याप्रसंगी नमूद केले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शाखांच्या वतीने आयोजित मेळावा अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाचे कुशल संचालन श्रीहरी शेंडे (सचिव) गुरुजींनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष रमेश नागपुरे यांनी केले. वधू वर परिचय याचे संचालन इंजी. सुवर्णा कामड, मनोहर नागपुरे, नितेश वाघाडे यांनी केले.असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात येते.

संतोष गर्गेलवार
प्रसिद्धी प्रमुख
चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ जिल्हा चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here