Home Breaking News नागपूर रोडवरील जनता कॉलेज चौकात सुरू असलेल्या बांधकामादरम्यानमजूर कॉलमवर पडल्याने फुफ्फुसाच्याबरगड्यापर्यंत आरपार...

नागपूर रोडवरील जनता कॉलेज चौकात सुरू असलेल्या बांधकामादरम्यानमजूर कॉलमवर पडल्याने फुफ्फुसाच्याबरगड्यापर्यंत आरपार सलाख घुसल्याची थरारक घटना

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

फुफ्फुसातून आरपार घुसली सळई, डॉक्टरांनी वाचवले प्राण

बिना सेफ्टी ने बिल्डिंग बांधकाम करणाऱ्या मालकावर किंवा ठेकेदारावर कारवाई होणार का?

चंद्रपूर  :-  सेंटिंग लावण्याचे काम करत असताना अचानक सेटिंगची पाटी मजुरावर पडली. तोल गेल्याने तो मजूर कॉलमवर पडल्याने हाताच्या मागच्या बाजूने बरगड्यांमधून समोरच्या भागातील फुफ्फुसाच्याबरगड्यापर्यंत आरपार सलाख घुसल्याची थरारक घटना रविवारी दुपारी १२ वाजता नागपूर रोडवरील जनता कॉलेज चौकात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान घडली.

डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्या मजुराचे प्राण वाचवले असून मानवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

नंदकुमार जखराखण पंच (३२) रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर असे जखमी मजुराचे नाव आहे. जनता कॉलेज चौकात एका मोठ्या ब्लिडींगचे बांधकाम सुरु असून मोठ्या प्रमाणात मजूर कामावर आहेत. रविवारी या ब्लिडिंगच्या सेटिंगच्या पाट्या काढण्याचे काम मजूर करत होते. दरम्यान नंदकुमार वर चढून सेंट्रिग काढत असताना एक पाटी त्यांच्या अंगावर पडल्याने त्याचा तोल गेल्याने बाजूच्या कॉलमच्या निघालेल्या सळाखीवर तो फेकल्या गेला.

सळाख बरगड्यांमधून आरपार घुसल्याचे लक्षात येताच इतर मजूर मदतीला धावले. त्यांनी कटरने सळाख कापली. याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले, नापोशी देवीदास राठोड व त्यांची चमू रुग्णवाहिका घेऊनच घटनास्थळावर पोहोचली. त्यांनी नंदकुमार याला जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर कंत्राटदाराने त्याला मानवटकर रुग्णालयात दाखल केले.

शस्त्रक्रियेनंतर काढली सळाख…

रुग्णाची परिस्थिती बघून मानवटकर हॉस्पिटलमधील शल्यचिकीत्सक डॉ. माधुरी मानवटकर यांनी लगेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन लगेच शस्रक्रिया केली. यावेळी फुफ्फुसाला थोडी जखम झाल्याचे समोर आले. सद्यःस्थितीत नंदकुमारची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

रुग्णालयात आलेल्या रुग्णाच्या आरपार सळाख घुसली होती. त्यामुळे लगेच शस्त्रक्रिया केली. त्याच्या फुफ्फुसाला जखम झाली आहे. सद्यःस्थितीत त्याची प्रकृती स्थिर असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

बिना सेफ्टी ने बिल्डिंग बांधकाम करणाऱ्या मालकावर किंवा ठेकेदारावर कारवाई होणार का?

नागपूर रोडवरील जनता कॉलेज चौकात सुरू असलेल्या मोठ्या बिल्डिंग चे बांधकाम सुरु असून येथील लेबर, मिस्त्री, कामगारांना, कोणत्याही प्रकारची सुरक्षा अथवा सेफ्टी नसून हे बांधकाम सुरू आहे. आणि याच कारणाने दिनांक 14, जानेवारी 2024, ला जनता कॉलेज चौकातील बिल्डिंग बांधकामामध्ये हे दुर्घटना घडलेली आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल की नाही? आणि पोलीस प्रशासन कोणावर कारवाई करणार बिल्डिंगवरील मालकावर अथवा ठेकेदारावर? आणि इतकी मोठी हानी झाल्यावर सुद्धा आता तरी येथील कामगारांना सुरक्षा किंवा सेफ्टी देऊन काम करणार की पुन्हा तसेच रामभरोसे चालणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here