Home वरोरा ब्रेकिंग :- वरोरा तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच यांच्यावर आज अविश्वास?

ब्रेकिंग :- वरोरा तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच यांच्यावर आज अविश्वास?

राहुल ठेंगने यांच्या नेतृत्वात कोकण यात्रा उरकवून ग्रामपंचायत सदस्य निवडणार आज नवा सरपंच. सरपंच पदी पोहचविणाऱ्या राजू मिश्रा यांना डावलंने पडले महागात.

वरोरा :-

सत्ता मिळाली की त्या सत्तेची हवा कधी डोक्यात जाईल हे सांगता येत नाही, त्यात ग्रामपंचायत स्थरावर सरपंच म्हटले की गावाचे सर्वेसर्वा असतो, अशाच तोऱ्यात वावरणाऱ्या बोर्डा या गावाच्या सरपंच ऐश्वर्या वसंत खामनकर यांच्या एकहाती सत्तेचा वावर तेथील उपसरपंच आणि इतर सदस्यांना पचणी पडला नाही, त्यामुळे सरपंच यांना सत्तेतून बेदखल करण्यासाठी उपसरपंच राहुल ठेंगणे यांनी नऊ सदस्य घेऊन कोकणवारी व त्यात देवदर्शनाची सहल केली आणि आज महिला सरपंच यांच्यावर ते अविश्वास आणणार आहे, दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत पेनेल निवडून आणण्यात ज्या राजू मिश्रा यांनी आपली ताकत पणाला लावली त्यांनाच डावलले गेले असल्याने हा अविश्वास ठराव येणार असल्याचे बोलल्या जात आहे आता नवा सरपंच कोण याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

बोर्डा ही ग्रामपंचायत तशी श्रीमंत आहे, कारण वरोरा शहराला लागून असल्याने या गावाच्या परिसरातील जमिनी व तिथे पडलेले लेआऊट यामुळे ग्रामपंचायतला दरवर्षी कोट्यावधी रुपयाचा कर मिळत असतो, एवढेच नाही तर बांधकाम परवानगी करिता एक्स्ट्रा पैसे सरपंच व सचिवाला मिळत असते, दरम्यान कोट्यावधी रुपयाच्या विकास कामात कमिशन ठरलेले असतें त्यामुळे सरपंच यांची वार्षिक चांगली आर्थिक उलाढाल होतं असल्याने या गावाचे सरपंच सुद्धा श्रीमंत होतं असतो, त्यामुळे या सर्व कमिशन व टक्केवारी च्या प्रेमात पडलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना आपल्याकडे सुद्धा सरपंच सचिवानी बघावं अशी अपेक्षा असतें शिवाय मान सन्मान सुद्धा त्यांना हवा असतो पण त्याकडे सरपंच यांनी दुर्लक्ष केल्याने व माझ्या मताप्रमाणे सर्व गोष्टी होईल या त्यांच्या हेकेखोर धोरणामुळे सर्व सदस्यांनी एकमत करून सरपंच ऐश्वर्या वसंत खामनकर यांच्यावर अविश्वास आणला गेल्याची चर्चा आहे. आता त्यांच्यावरचा अविश्वास होतो की बरगळंला जातो हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here