Home चंद्रपूर मानवतेच्या नात्यातून ” तिळगुळाचा’ गोडवा जीवनात कायम असू द्या – विरोधी पक्षनेते...

मानवतेच्या नात्यातून ” तिळगुळाचा’ गोडवा जीवनात कायम असू द्या – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चौगान येथे मकर संक्रांत महोत्सव – महिलांसाठी विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रम

मानवतेच्या नात्यातून ” तिळगुळाचा’ गोडवा जीवनात कायम असू द्या – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

चौगान येथे मकर संक्रांत महोत्सव – महिलांसाठी विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रम

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-ब्रम्हपुरी तालुका मानवी जन्म घेणाऱ्या प्रत्येकाने समाजात राहून माणुसकीचे नाते जपले पाहिजे. धर्म, जात, वर्ण, चालीरीती, रूढी, परंपरा या अंगलट न आणता व अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञान युगात जगताना माणुसकी या सर्वात मोठ्या धर्माची शिकवण अंगीकारणे काळाची गरज आहे. मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर जे तिळगुळ दिल्या जाते त्याचा गोडवा कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात जपून ठेवावा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान येथे आयोजित मकर संक्रांत महोत्सवात उद्घाटक म्हणून बोलत होते.

आयोजित मकर संक्रांत महोत्सवानिमित्त कार्यक्रमात
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते, ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार
सहउद्घाटक म्हणून माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे हे तर अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांची उपस्थिती होती. सहअध्यक्ष म्हणून नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार हे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई पारधी, राजीव गांधी पंचायतराज संघटनचे प्रदेश महासचिव थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, बाजार समितीच्या उपसभापती तथा न.प. सभापती सुनिताताई तिडके, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगलाताई लोनबले, तालुका काॅंग्रेस उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, मुंबई येथील कंत्राटदार विजय भागडकर, माजी पोलीस पाटील किशोर तिडके, बाजार समितीचे संचालक दिवाकर मातेरे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा. डी. के. मेश्राम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, माजी सरपंच ईश्वर ठाकरे, उपसरपंच सुरेश ठिकरे, माजी अध्यक्ष से.सो. अनिल पिलारे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, क्षेत्र विकासासोबतच जनतेचे आरोग्य, शासनाचे जनकल्याणकारी योजना, व त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता रोजगार शिक्षण व मूलभूत सुविधा करण्याची सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी नात्याने माझी असून ती मी सदैव विश्वासहतेने पार पाडणर अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्रास्ताविक खेमराज तिडके यांनी तर सूत्रसंचालन संतोष पिलारे यांनी केले.

बॉक्स -:
गावकऱ्यांनी अनुभवला महीला कबड्डीचा थरार

संक्रांत महोत्सव निमित्ताने आयोजित महिला कबड्डी स्पर्धेत गावातील महिलांनी सहभाग घेतला. या महिलांनी कबड्डी सामन्यांमध्ये दाखवलेले डावपेच बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महिलांसाठी संगीत खुर्ची व हळदी कुंकू, वाणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.
त्यानंतर रात्री एकल व सामुहीक नृत्य स्पर्धा घेण्यात आली. त्यात गावातील महिलांसह मुला-मूलींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांचे परिक्षण राहुल मैंद व पराग सहारे यांनी केले.
विविध स्पर्धांसाठी रोख बक्षीसे सुध्दा ठेवण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी मोटीव्हेशनल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात नांदेड येथील बालाजी गाडे, माजी प्राचार्य भाऊराव राऊत यांनी मार्गदर्शन केले.

वृध्दांना ब्लॅंकेटचे वितरण
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके व कंत्राटदार विजय भागडकर यांच्या कडून गावातील वृध्दांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here