सावली येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:-सावली शहरातील आज दोन कॅन्सर रुग्णांना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार व सावली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे यांच्या हस्ते सदर निधी देण्यात आली.*
*सावली शहरातील कॅन्सरग्रस्त रुग्ण सचिन मधुकर घोनमोडे वय ३८ वर्षे यांचे वर्धा येथे उपचार सुरु आहेत तर सौ.मंगलाबाई रामभाऊ दडमल वय ५६ वर्षे यांचे नागपूर येथे उपचार सुरु आहेत दोन्ही घरातील कर्तबगार व्यक्ती असून कॅन्सरने त्रस्त आहेत,घरातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने पूढील उपचारासाठी मदत हवी असल्याची माहिती सावली तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीनजी गोहने यांना मिळाली तात्काळ त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून दिली.*
*सदर आर्थिक मदत देताना सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार व सावली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे ,आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा मा.अंतबोध बोरकर,नगरसेविका सौ.सीमा संतोषवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.राहुल उंदीरवाडे,मा.आयुष संतोषवार,मा.यश गेडाम आदी उपस्थित होते.*