Home चंद्रपूर लोंढोली येथे कॅन्सरग्रस्त रुग्णाला विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत

लोंढोली येथे कॅन्सरग्रस्त रुग्णाला विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत

लोंढोली येथे कॅन्सरग्रस्त रुग्णाला विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-सावली तालुका राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे ग्राम काँग्रेस कमिटी लोंढोलिचे अध्यक्ष मा.दिलीप लटारे,सरपंच मा.उष्टू पेंदोर यांच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली*

*मौजा. लोंढोली गावातील कॅन्सरग्रस्त रुग्ण वनमाला धनराज ईटनकर वय ४२ वर्षे ह्या घरातील कर्तबगार कुटुंब प्रमुख महिला असून बऱ्याच दिवसापासून प्राथमिक उपचार करीत होत्या परंतु वारंवार त्यांना अस्वस्थ जाणवत होते,उपचारदरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले घरातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने पूढील उपचारासाठी मदत हवी असल्याची माहिती सावली तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीनजी गोहने यांना मिळाली तात्काळ त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून दिली.*

*सदर आर्थिक मदत देताना ग्राम काँग्रेस कमिटी लोंढोलिचे अध्यक्ष मा.दिलीप लटारे,सरपंच मा.उष्टू पेंदोर,उपसरपंच मा.प्रमोद खोबे,ग्रा.प सदस्या शिल्पाताई भांडेकर,मा.अंकित मुनघंटीवार मा.भास्कर गेडाम,मा.सुरेश सातपुते,मा.सुरेश घोगडे,मा.राजू घोंगडे आदी उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here