Home चंद्रपूर श्री प्रभु रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने 11 प्रकारच्या भातांचे...

श्री प्रभु रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने 11 प्रकारच्या भातांचे महाप्रसाद वितरण संस्कार टिव्ही फेम भजन सम्राट दिनेशजी शर्मा यांच्या भजन कार्यक्रमाने राममय वातावरण

श्री प्रभु रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने 11 प्रकारच्या भातांचे महाप्रसाद वितरण

संस्कार टिव्ही फेम भजन सम्राट दिनेशजी शर्मा यांच्या भजन कार्यक्रमाने राममय वातावरण

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-अयोध्या येथे पार पडलेल्या रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिका पटांगणात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 11 प्रकारच्या भातांचा महाप्रसाद वितरित केला गेला. तर संस्कार टिव्ही फेम भजन सम्राट दिनेशजी शर्मा याच्या भजन कार्यक्रमाचे राममय वातावरण निर्माण झाले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, दामोदर सारडा, डाॅ. सुशिल मुंधडा, शिव सारडा, सुरेश राठी, राजेश काकानी, राजु शास्त्रकार, संदिप भाटिया, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, महिला शहर प्रमूख वंदना हातगावकर, सविता दंडारे, सायली येरणे, नकुल वासमवार, विनोद अनंतवार, बबलू मेश्राम, आशा देशमूख, करणसिंग बैस, किशोर बोलमवार, हेरमन जोसेफ, कार्तीक बोरेवार, दुर्गा वैरागडे, वंदना हजारे, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आज सोमवारी अयोध्या येथे पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त संपूर्ण देशात विविध धार्मीक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूरातही आमदार किशोर जोरगेवार संस्थापक अध्यक्ष असलेल्या यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिकेच्या पटांगणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8.00 वाजता पासून या कार्यक्रमांना सुरवात झाली. यावेळी भव्य एलईडी स्क्रीनवर अयोध्या मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. सकाळी 8.30 वाजता लखमापूर भजन मंडळाच्या वतीने सुंदरकांड करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजेपासून संस्कार टिव्ही फेम भजन सम्राट दिनेशजी शर्मा यांच्या भजन कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी दिनेशजी शर्मा यांनी आपल्या भक्तीमय भजनाने धार्मीक वातावरण निर्माण केले. त्यांच्या भजन कार्यक्रम पाहण्यासाठी रामभक्त चंद्रपूरकरांनीही मोठी गर्दी केली होती. तर चंद्रपूर जिल्हा भात उत्पादक जिल्हा असल्याने 11 प्रकारच्या भातांचे महाप्रसादाचेही येथे वितरण करण्यात आले. यात गोड भात , मसाला भात , खट्टा भात , दही भात, गद्दा भात , गुळ भात, दाल खिचड़ी भात, मटर भात, पालक भात, टमाटर भात, मसूर भात आदी प्रकारच्या भातांचा समावेश होता. यावेळी हजारो नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

*आमदार किशोर जोरगेवार यांनी केली रामलल्लाची आरती*

अयोध्या येथे रामलल्लाची आरती सुरु होताच आमदार किशोर जोरगेवार यांनीही कार्यक्रमाच्या आयोजित स्थळी रामलल्लाची आरती केली. या आरतीत शेकडो चंद्रपूरकर सहभागी झाले होते. यावेळी ११ प्रकारच्या भातांचा श्री प्रभू रामचंद्र यांना प्रसाद चढविण्यात आला. आजचा दिवस देशासाठी गौरवाचा आहे. इतिहासात या दिवसाची नोंद केली जाणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here