Home चंद्रपूर श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनी जनता कॉलेज चौकातील श्री केसरी गणेश मंडळाकडून महाप्रसादाचा कार्यक्रम...

श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनी जनता कॉलेज चौकातील श्री केसरी गणेश मंडळाकडून महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 श्री केसरी गणेश मंडळाकडून विधीवत पुजा व भक्तिमय संगीत लावून महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात

चंद्रपूर  :-  अयोध्दा येथील श्री. राममंदीर मधील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमीत्य जनता कॉलेज चौकातील श्री केसरी गणेश मंडळाकडून विधीवत पुजा व भक्तिमय संगीत लावून महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली.

या वेळी श्री केसरी गणेश मंडळातील माजी अध्यक्ष आनंद चकिनारपवार यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. व  श्री गणेश मंडळाचे मुख्य पदाधिकारी अनिल काळे, अजय बलकी, व समस्त केशरी गणेश मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच साईबाबा वार्डातील असंख्य महिला – पुरुष  व सोबतच बालगोपालांनी पण श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा च्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने व सहखुशीने उपस्थिती दाखवली आणि या कार्यक्रमाला पार पाडण्यास सहकार्य केले.

अयोध्या धाममध्ये श्री राम लल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण प्रत्येकालाच भावनिक करणारा आहे. या दिव्य कार्यक्रमाचा भाग होणं सर्वासाठी भाग्याचा क्षण आहे, ५०० वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर अयोध्दा येथे श्री. राममुर्तीची प्राणप्रतिष्ठा देशाचे लोकप्रीय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

रामलल्ला च्या प्राण प्रतिष्ठा मुळे श्रीराम जन्मभूमी आयोध्यासह संपुर्ण भारतात भक्तीमय वातावरण झालेलें आहे. या ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार संपूर्ण देश झालेला आहे, राम फक्त कोणाचा नव्हे तर सर्वाचा आहे, अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चंद्रपूर क्षेत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

व रामभक्त आपल्या स्वइच्छेनुसार सहभागी होत आहे, श्री. राममुर्तीची प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधुन आज : नागपूर रोड जनता कॉलेज चौकात महाप्रसाद वाटप करण्यात आला. तसेच महाप्रसादाच्या रामभक्तांनी ज्यावेळेस आसाद घेत होते त्यावेळेस रामाचे भक्तिमय असे संगीत सुद्धा लावण्यात आले होते.

आणि या संगीतामध्ये जेव्हा राम भक्त महाप्रसादाचा लाभ घेत होते. तेव्हा सर्व रामभक्त आणि येथील नागरिक भक्तिमय आणि अलौकिक मन प्रसन्न आणि आनंदी होते. या ऐतिहासिक भावनिक क्षणाचे साक्षीदार होणे मोठे सौभाग्य असल्याचे यावेळी श्री केसरी गणेश मंडळातील माजी अध्यक्ष आनंद चकिनारपवार मन्हाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here