Home चंद्रपूर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह प्रशिक्षण शिबिर आयोजन

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह प्रशिक्षण शिबिर आयोजन

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) अंतर्गत जनता महाविद्यालय, चंद्रपूर आणि वाहतूक नियंत्रक शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर संस्थेचे सचिव डॉ. अशोकभाऊ जीवतोडे, जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष आणि ने. यू. के. जिल्हा युवा अधिकारी समशेर सुभेदार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर बलकी यांच्या मार्गदर्शनात निकिलेश चामरे यांच्या नियोजनातून महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी 25 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना वाहतुकीचे नियम व वाहन चालकांनी वाहन चालवतेवेळी घ्यावयाची काळजी यावर मा. प्रवीण कुमार पाटील (पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रक शाखा, चंद्रपूर) यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी त्यांनी माहिती दिली की शहरातील विविध सिग्नल वर विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यासाठी उभे राहायचे आहे आणि आता प्रशिक्षण दरम्यान दिलेल्या माहिती नुसार तिथे सिग्नल वर प्रत्यक्ष कार्य करायचे आहे. सोबत अंमलदार संदीप जाधव यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. आशिष महातळे (उपप्राचार्य, कला शाखा), ॲड. देवा पाचभाई विदर्भ अध्यक्ष (सरपंच संघटना), प्रा. अमर बल्की राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा. गणेश येरगुडे राष्ट्रीय सेवा योजना, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर (युथ लीडर) मिकीलेश चामरे यांनी केले.
कार्यक्रम संचालन व आभार विशिता सूर्यवंशी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here