Home वरोरा दखलपात्र :- वरोरा नागरी सहकारी पतसंस्थेत घोटाळा, ग्राहकांचं ठिय्या आंदोलन.

दखलपात्र :- वरोरा नागरी सहकारी पतसंस्थेत घोटाळा, ग्राहकांचं ठिय्या आंदोलन.

तेजस्विनी व सिद्धिविनायक नागरी पत संस्थेच्या ग्राहकांची फसवणूक प्रकरणी चौकशी सुरु असताना पुनः एक पत संस्था वादात

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील शहरी व ग्रामीण जनतेच्या कमाई चा पैसा बचत करण्याच्या नावाखाली तेजस्विनी व सिद्धिविनायक नागरी सहकारी पत संस्थेच्या संचालकांनी हडप करून ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी तालुका सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी सुरु असताना वरोरा नागरी सहकारी पत संस्था मर्या. वरोरा र.नं. ६१० डबघाईस आल्याचा प्रकार समोर आल्याने त्या व पत संस्थेच्या अध्यक्षानी राजीनामा नाट्य करून ग्राहकांना वेठीस धरले असल्याने जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावने व मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात संस्थेच्या ग्राहकांना घेऊन तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन कारण्यात आले.

वरोरा नागरी सहकारी पत संस्थेच्या संचालक मंडळ व व्यवस्थापक यांनी आर्थिक घोटाळा केल्याबाबत मधुकर मारोती तितरे या अभिकर्ता यांनी तालुका सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती, दरम्यान या संस्थेच्या अध्यक्षानी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ग्राहकांच्या पैशाची परतफेड कोण करेल या विवंचनेत दैनिक व मासिक अभिकर्ता सापडल्याने त्यांनी जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावणे यांच्याकडे धाव घेतली, ग्राहकांच्या हाकेला धावून त्यांनी सगळ्या ग्राहकांना एकत्र करून तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय गाठले व त्यांना जबाब विचारला असता त्यांनी याबाबत संस्थेच्या संचालकांना नोटीस देऊन बोलावले आहे व ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित आहे की नाही याबाबत सगळे दास्तावेज पाहून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले मात्र जर संस्थेचे कार्यालयच बंद राहील तर ग्राहक जाणार कुठे हा प्रश्न उपस्थित केला असता जर संचालक मंडळाचा कारभार भ्रष्ट असेल तर या संस्थेवर प्रशासक बसवून ग्राहकांना त्यांचे जमा पैसे नक्की देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन ग्राहकांना सहाय्य्क तालुका निबंधक यांनी दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र येणाऱ्या महिन्याभरात जर संस्थेच्या संचालकांनी ग्राहकांचे पैसे परत केले नाही तर पुन्हा ग्राहकांना घेऊन ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.

काय आहे वरोरा नागरी पत संस्थेची स्थिती.

वरोरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या, वरोरा ग.न. ६१० येथे दैनिक व मासिक बचत अभिकर्ता म्हणून काही व्यक्ती २०१३ पासून कार्य करीत आहे. व शेतमजूर, कामगार व छोटे व्यावसायिक यांचेकडून दैनिक व मासिक कलेक्शन करून सदर संस्थेमध्ये भरणा होतं आहे. सर्व या पतंसरथेचे अंदाजे १५० ते २०० ग्राहक असून यांची अंदाजे 25 ते 30 लाख आहे दरम्यान डिसेंबर 2023 पासून ग्राहकांनी रक्कमेची मागणी केली असता या पतसंस्थेचे व्यवस्थापक व संचालक हे त्यांच्या जमा असलेल्या पैशाची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे, ज्या ग्राहकांनी त्यांच्या आर्थिक अडचणीसाठी रक्कम जमा केली होती व आता या रक्कमेची त्यांना अत्यंत गरज आहे. असे असून सुध्दा पतसंस्थेचे व्यवस्थापक व संचालक हे रक्कम देण्यास नकार देत असल्याने ग्राहक आक्रमक झाले आहे दरम्यान एक महिन्यात जर संचालकांनी पैशाची परतफेड केली नाही तर सर्व ग्राहकांना घेऊन सहाय्य्क तालुका निबंधक कार्यलयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा अँड अमोल बावणे यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मधुकर मारोती नितरे, राहुल नंदलाल न्याती व असंख्य ग्राहक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here